शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
2
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
3
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
4
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
5
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
6
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
7
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
8
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
9
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
10
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
11
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
12
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
13
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
14
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
15
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
16
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
17
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
18
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
19
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
20
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जि. प. समोर धरणे

By admin | Updated: August 2, 2016 01:09 IST

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाद्वारे किमान वेतन दिले जाते; पण ते अत्यल्प असून त्यात नियमितता नाही.

वर्धा: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाद्वारे किमान वेतन दिले जाते; पण ते अत्यल्प असून त्यात नियमितता नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासह अन्य समस्याही प्रलंबित असून त्या त्वरित सोडवाव्या, या मागणीसाठी सोमवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून धरणे दिले. यावेळी कर्मचाऱ्यांनी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांना निवेदनातून समस्या सोडविण्याचे साकडे घातले. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास जि.प.वर धडकलेल्या मोर्चात जिल्ह्यातील ग्रा.पं. कर्मचारी सहभागी झाले. जि.प.च्या प्रवेशद्वारावर मोर्चा अडविल्यानंतर शिष्टमंडळाने सीईओ गुंडे यांना निवेदन दिले. यावेळी सुमारे एक तास धरणे देण्यात आले. निवेदनानुसार, ग्रा.पं. कर्मचारी न.प. कर्मचाऱ्यांप्रमाणे गावातील सफाई, गटारे, पाणी, विद्युत पुरवठा, कर वसुली, पाणी शुद्धीकरण केंद्र, विविध योजना गाव पातळीवर प्रत्येक घरापर्यंत पोहोचविणे आदी कामे करतात. कर्मचारी २४ तास कार्यरत असताना त्यांना वेतनश्रेणी लागू नाही. यामुळे न.प. कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी नियम लागू करावा, १ जानेवारी २००० पासून किमान वेतन लागू केले. दर पाच वर्षांनी सुधारित किमान वेतनाचे दर लागू करणे गरजेचे होते; पण तसे न करता २००७ व २०१३ किमान वेतनाचे सुधारीत दर लागू केले. हा अन्याय असून सुधारित वेतनाची अधिसूचना जाहीर करावी. सेवाकाळात मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना नियुक्ती द्यावी. ग्रा.पं. कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित शासन निर्णयाला बगल देणाऱ्या ग्रा.पं. वर कार्यवाही करावी. कर्मचाऱ्यांना डॉ. दीपक मैसेकर समिती अहवालानुसार पेन्शन योजना लागू करावी. भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी. ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे आकृतीबंध १९८१ च्या लोकसंख्येच्या आधारे २१ जानेवारी २००० च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. गावाचे शहरीकरण झाल्याने राज्यात ६० हजार कर्मचारी सेवेत आहे. त्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी आदी मागण्या करण्यात आल्या.(कार्यालय प्रतिनिधी)