गडकरी यांची हजेरी : परिसरात वृक्षारोपणकारंजा (घा.) : कारंजा संत्रा निर्यात केंद्रावरून महाआॅरेन्जच्यावतीने रविवारी संत्र्याच्या आंबीया बहाराची ग्रेडींग, कोटींग प्रक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. याप्रसंगी ना. प्रवीण पोटे, खा. रामदास तडस, महाआॅरेन्जचे कार्यकारी अध्यक्ष श्रीधर ठाकरे उपस्थित होते. सात वर्षांपासून बंद असलेला प्रकल्प गडकरी यांच्या सूचनेनुसार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून महाआॅरेन्जला चालवायला दिला. महाआॅरेन्जने गतवर्षी श्रीलंका येथे संत्रा निर्यात केला. सोबतच देशांतर्गत ‘मॉल’मध्ये शेतकऱ्यांचा संत्रा विक्रीस पाठविला. कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून महाआॅरेन्जने शेतकऱ्यांचा १४०० टन संत्रा ‘शेतकरी ते ग्राहक थेटविक्री’द्वारे देशातील विविध शहर व महानगरांत विक्री केला. यामुळे शेतकऱ्यांच्या संत्र्याला योग्य दर मिळाला. यावेळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविणार असून शेतकऱ्यांची संत्री कुठल्याही मध्यस्थीशिवाय खासगी कंपनीला विकायची तयारी महाआॅरेन्जने चालविल्याचे श्रीधर ठाकरे यांनी सांगितले. गडकरी यांनी प्रकल्पात अद्यावत मशिनरीबाबतच्या सूचना दिल्या. बंद प्रकल्प सुस्थितीत सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी प्रकल्प परिसरात गडकरी व मान्यवरांनी संत्र्यांच्या कलमांचे रोपण केले. कृषी समृद्धी प्रकल्पातून आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील १०७ शेतकऱ्यांनी शेडनेट व बागायती शेतीचे प्रशिक्षण घेतल्याचे राहुल ठाकरे यांनी सांगितले. गडकरी यांनी त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. संचालक मंडळ, भाजप कार्यकर्ते, कृउबास सभापती, उपसभापती व संचालक उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
महाआॅरेन्जच्या आंबीया बहाराच्या ग्रेडींग, कोटींग प्रक्रियेला प्रारंभ
By admin | Updated: October 3, 2016 00:46 IST