शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

जिल्ह्यात १२६ शाळांना ‘ए ग्रेड’

By admin | Updated: April 27, 2017 00:40 IST

राज्याच्या शिक्षण विभागाकडून या शैक्षणिक सत्रात शाळांचा दर्जा ठरविण्याकरिता सुरू केलेल्या शाळा सिद्धीच्या प्रक्रियेची गती मंदावली आहे.

शाळा सिद्धीला ब्रेक : १५०७ शाळांचे गे्रडेशन रूपेश खैरी   वर्धा राज्याच्या शिक्षण विभागाकडून या शैक्षणिक सत्रात शाळांचा दर्जा ठरविण्याकरिता सुरू केलेल्या शाळा सिद्धीच्या प्रक्रियेची गती मंदावली आहे. या कामाला आता जून वा जुलै महिन्यात प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील शाळांचे ग्रेडेशन निश्चित झाले असून १२६ शाळा ‘ए ग्रेड’ मध्ये आल्यात. या शाळांची पाहणी शिक्षण विभागाचे अधिकारी उन्हाळ्यानंतर करतील, असे सांगण्यात आले. शाळा सिद्धीला प्रारंभी मोठा विरोध झाला होता. अखेर शासनाचा उपक्रम म्हणून त्याचा स्वीकार झाला. या उपक्रमात सहभागी होण्याकरिता आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य होते. त्यानुसार जि.प. च्या सर्व १५०७ शाळांकडून आॅनलाईन अर्ज करण्यात आले. यानुसार तब्बल १२६ शाळांना ‘ए ग्रेड’ देण्यात आला आहे. ५१८ शाळांना ‘बी’, ५५५ शाळांना ‘सी’ व ३०८ शाळांना ‘डी ग्रेड’ देण्यात आला आहे. ग्रेड दिल्यानंतर राज्यस्तरीय समिती शाळांची पाहणी करणार होती; पण उन्हामुळे ती पुढे ढकलल्याचे शिक्षण विभागाद्वारे सांगण्यात आले. या शाळांचा सर्व्हे जून वा जुलैमध्ये होणार आहे. महिना ठरला; पण दिनांक निश्चित नाही. यामुळे सर्व्हे नेमका कधी व कसा होईल, याबाबत साशंकता आहे. सर्व्हे उन्हामुळे रद्द झाला की अधिकाऱ्यांतील ज्येष्ठतेच्या कारणावरून, यावर शिक्षण विभागात चर्वन सुरू आहे. यामुळे शाळा सिद्धीत बसणाऱ्या शाळांना किमान एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे, हे खरे! आतापर्यंत शाळेची गुणवत्ता श्रेणीनुसार ठरत होती. ती आता ग्रेडनुसार ठरणार आहे. याच ग्रेडेशन पद्धतीला शिक्षण विभागाने शाळा सिद्धी असे नाव दिले. पूर्वी श्रेणी पद्धतीत १०० गुणांची परीक्षा होती. यात शाळा परिसर, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, इमारत आदी बाबी तपासत. यानुसार गुणांकण होई. नव्या पद्धतीत याच बाबी तपासणार असून ९९९ गुण देण्यात आले आहे. ‘सी ग्रेड’ मध्ये सर्वाधिक शाळा जिल्ह्यातील सर्वच शाळांनी आॅनलाईन प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शाळांचे ग्रेड ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शाळा सी ग्रेड मध्ये आल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील तब्बल ५५५ शाळांना सी ग्रेड मिळाला तर डी ग्रेड मध्ये ३०८ शाळा आहेत. लाहोरी शाळेला ९९९ पैकी ९९७ गुण जि.प. च्या लाहोरी येथील शाळेला सर्वाधिक गुण प्राप्त झाले. या शाळेला ९९७ गुण असून पूर्ण गुणांपैकी केवळ दोन गुण कमी आहे. यामुळे सदर शाळेकडे शिक्षण विभाग विशेष लक्ष देणार असल्याचे शिक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले.