शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

शासकीय कामे उठली नागरिकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

अनेक ठिकाणी कामे अर्धवट राहत असून नियोजनाच्या अभावामुळे ही कामे नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. मलवहन व निस्सारणाचे काम या योजनेमुळे सुरळीत होणार आहे. तर शहरात नाल्यांतून वाहणाऱ्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका दूर होणार आहे. मात्र, हे काम करताना सुरुवातीपासूनच योग्य नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. नगरपालिका केवळ आर्थिक नियोजनाचाच भाग सांभाळत असल्याचे निश्चित आहे.

ठळक मुद्देसुरक्षेविनाच सुरू आहे काम : डायव्हर्शनचे फलकही फाटले; सूचनाफलकांचा अभाव, संबंधित यंत्रणेची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात मागील दीड वर्षांपूर्वीपासून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता सुस्थितीतील रस्त्यांचे फोडकाम करण्यात आले तर काही ठिकाणी डांबरी रस्ते खोदून सिमेंटीकरण करण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र, रस्त्यांची कामे करताना डायव्हर्शन दर्शविणारे फलक बेपत्ता झाले आहेत तर कुठे फलक फाटलेले आहेत. अनेक ठिकाणी सुरक्षेविनाच काम सुरू आहे. काम सुरु असलेला रस्ता दिसत नसल्याने अनेक वाहनधारकांना अपघात झाले असून गंभीर दुखापतही झाली आहे. ‘लोकमत’ने शहरात सुरू असलेल्या कामांवर जात पाहणी केली असता नियोजनाच्या अभावासह सुरक्षेविनाच कामे सुरू असल्याचे दिसून आले.शहरात दीड वर्षापूर्वी १०१ कोटी रुपये खर्चून अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले. मात्र, या कामात कुठेच सातत्य नाही. एखाद्या भागात नगरसेवकाच्या दबावात काम सुरू होते.मात्र, ते पूर्ण न करताच दुसरीकडे मुक्काम हलविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कामे अर्धवट राहत असून नियोजनाच्या अभावामुळे ही कामे नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसून येत आहे. मलवहन व निस्सारणाचे काम या योजनेमुळे सुरळीत होणार आहे. तर शहरात नाल्यांतून वाहणाऱ्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका दूर होणार आहे. मात्र, हे काम करताना सुरुवातीपासूनच योग्य नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. नगरपालिका केवळ आर्थिक नियोजनाचाच भाग सांभाळत असल्याचे निश्चित आहे. काही भागात भूमिगत गटारच्या कामाची खोली जास्त असल्याने एकाच ठिकाणी यंत्रणा अडकून पडल्याचे दिसते.पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. शहरातील छत्रपती शिवाजी चौकातून जेलरोडकडे जाणाऱ्या मार्गावर भूमिगतचे काम सुरू असून खोदकामातील मलबा रस्त्यावर टाकला असून कुठेही फलक लावलेले नाहीत. किंवा सुरक्षेचा फलकही तेथे लावण्यात आलेला नाही. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. खोदलेला रस्ता दिसत नसल्याने अनेक वाहनधारकांचे अपघात झाले आहे. जेलरोड कडे जाणाºया मार्गाचेही तेच हाल आहेत.सेंट अ‍ॅन्थोनी शाळेसमोरील एका बाजूचा सिमेंट रस्ता खोदण्यात आला असून कुठलाही सूचना फलक तेथे नसल्याने रात्रीच्या सुमारास वाहनचालकांना रस्ता दिसत नसल्याने दररोज अपघात होत आहेत. झाशी राणी चौक ते बजाज चौकाकडे जाणाºया रस्त्यालाही पोखरण्यात आले असून भूमिगत गटार योजनेचे पाईप टाकण्यात येत आहे. एकेरी रस्त्यावर वर्दळ असताना सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वाहने रस्त्याकडेला पडून अपघात होत आहेत. एकंदरीत या शासकीय कामांमुळे नागरिकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, कंत्राटदार, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे सोयरसुतक नाही.बांधकाम जलवाहिनीचे नुकसानझाशी राणी चौक ते बजाज चौकापर्यंतच्या एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण पूर्णत्वास गेले आहे. दुसºया बाजूने जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे. यात अमृत या वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नुकत्याच अंथरलेल्या मुख्य जलवाहिनीचे नुकसान होत आहे. काम करताना कंत्राटदाराकडून प्रचंड निष्काळजीपणा केला जात आहे. मात्र, यावरच कुणाचेही नियंत्रण दिसून येत नाही.‘त्या’ कडा ठरताहेत धोकादायकधुनिवाले चौक ते आरती चौकापर्यंत एकेरी रस्त्याचे सिमेंटीकरण पूर्णत्वास गेले आहे. डेरेदार वृक्ष वाचविण्यासाठी चौकटी सोडण्यात येऊन रस्ता बांधकाम करण्यात आले आहे. या सिमेंटच्या कडा कित्येक महिन्यांपासून उघड्याच आहेत. या कडांवरून वाहने घसरून दररोज अपघात होत आहेत. जीवघेण्या ठरत असलेल्या या कडा बुजविण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.बांधकाम मजुरांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?शहरात नियोजनाच्या अभावातच धडाक्यात विकासकामे सुरू आहेत. कोरोनाचे सावट कायम असताना मास्कविनाच मजूर काम करीत असल्याचे चित्र आहे. मजुरांना सुरक्षा साहित्य पुरविण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. गोपुरी चौक ते दत्तपूर टी-पॉइंट, धुनिवाले चौक ते आरती चौक, झाशी राणी चौक ते बजाज चौकापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान काम रखडले होते. जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर शासनाने शासकीय, खासगी बांधकामांना परवानगी दिली. रस्त्याचे रखडलेले काम गतीने सुरू झाले.धुनिवाले चौक ते आरती चौकापर्यंत एकेरी रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. सद्यस्थितीत दुसऱ्या बाजूचे काम सुरू आहे. झाशी राणी पुतळ्यापासूनही एकेरी रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले असून दुसऱ्या बाजूने खोदकाम केले जात आहे. रस्ता कामावरील मजुरांना सुरक्षा साहित्य पुरविणे कंत्राटदाराची जबाबदारी आहे.मात्र, शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली असता मजुरांकडे हॅण्डग्लोव्हज, बुट, जॅकेट आदी सुरक्षा साहित्य तर नाहीच कोरोनाने थैमान घातले असताना मजुरांकडे मास्कदेखील नाही. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचेही बांधकामाच्या ठिकाणी तीन-तेरा होत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका कायम आहे. या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी अभियंता नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचेही याकडे लक्ष कसे गेले नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.

टॅग्स :Governmentसरकार