शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृहातील संगणक धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:46 IST

समाज कल्याण विभागाद्वारे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथेच संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक देण्यात आले.

ठळक मुद्देप्रशिक्षकच नाही : समाज कल्याण विभागाचा गलथान कारभार, कार्यवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाज कल्याण विभागाद्वारे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथेच संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक देण्यात आले. यासाठी २०११-१२ या सत्रात कॉम्प्यूटरची खरेदी करण्यात आले. देवळी येथील वसतिगृहात संगणक देण्यात आले; पण अद्यापही शिकविण्यासाठी प्रशिक्षकाची नियुक्ती केली नाही. यामुळे वसतिगृहांतील संगणक बंद खोलीत धूळखात पडून आहे.राज्य शासनाने मागासवर्गीय वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण मिळावे या चांगल्या उद्देशाने ही योजना अमलात आणली. प्रारंभी या योजनेचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात आले; पण तीन-चार वर्षांचा कालावधी लोटला असताना या वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना कॉम्प्यूटर प्रशिक्षण देणारा शिक्षक महाराष्ट्र शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. यामुळे संगणकांचा वापरच होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशिक्षक नसल्याने विद्यार्थीच शिकतात आणि विद्यार्थीच शिकवितात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील चार-पाच वर्षांपासून धूळखात पडलेल्या या संगणकाच्या महत्त्वाच्या मुद्याकडे लोकप्रतिनिधी तथा अधिकाºयांचेही दुर्लक्ष होत आहे.वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणकाचे महागडे प्रशिक्षण मोफत मिळावे, हा उद्देश्य सफल होताना दिसून येत नाही. कॉम्प्यूटर प्रशिक्षण घेऊन पुढील जीवनात विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, ही चांगली कल्पना होती; पण शासकीय उदासिनतेमुळे हा चांगला उद्देश्य दुर्लक्षित राहिला आहे. वास्तविक, दोन -तीन वसतिगृह मिळून एक प्रशिक्षक नेमणे शासनासाठी फार कठीण बाब नव्हती; पण या योजनेकडेच शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष देत संगणक सुरू करणे तथा योजनेचा लाभ देण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. शासनाने लक्ष देत प्रत्येक वसतिगृहामध्ये प्रशिक्षकाची नियुक्ती करावी, विद्यार्थ्यांना वसतिगृहातच संगणकाचे प्रशिक्षण देण्याची सोय करावी, अशी मागणी रिपाईचे नरेंद्र ओंकार यांनी निवेदनातून केली आहे.चांगल्या योजनेला प्रशासकीय उदासिनतेचे ग्रहणशासकीय वसतिगृहांमध्ये राहून ग्रामीण भागातील गरीब, होतकरू मुले शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना महागडे प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. यामुळे शासनाच्यावतीने त्यांच्याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून वसतिगृहातील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून संगणक उपलब्ध करून देण्यात आले; पण प्रशिक्षकाची नियुक्ती केली नाही. शिवाय संगणकही बंद खोलीत पडून आहे. यामुळे चांगल्या योजनेला उदासिनतेचे ग्रहणच लागले आहे.