शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

शासकीय अनास्थेने बांबु कामगारांवर उपासमार

By admin | Updated: January 11, 2015 23:04 IST

वनविभागाच्या अनास्थेमुळे येथील आदिवासी बांबु कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभर वन विभागातर्फे निस्तार दराने बांबू पुरवठा केल्यास या कामगारांच्या हाताला काम मिळेल.

वर्धा : वनविभागाच्या अनास्थेमुळे येथील आदिवासी बांबु कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभर वन विभागातर्फे निस्तार दराने बांबू पुरवठा केल्यास या कामगारांच्या हाताला काम मिळेल. यातून बेरोजगारीची समस्या सुटेल, जिल्हा नियोजन विकास आराखड्यात बांबु साठ्याकरिता शेड तयार केल्यास हा प्रश्न मार्गी लागेल. जिल्ह्यात शेड बांधाकामाकरिता तरतुद करण्याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कामगारांनी साकडे घातले.बांबु कामगारांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री व वित्तमंत्री मुनगंटीवार यांना यावेळी सादर केले. येथील वनविभागाकडे वर्षभर पुरवठ्याकरिता बांबु नाहीत. यामुळे आदिवासी बांबु कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. हाताला काम नसल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. बुरड कामाकरिता येणाऱ्या बांबूच्या पुरवठ्यात अनियमितता आहे. हा पुरवठा लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वर्षभर बांबू पुरवठा झाल्यास बांबू कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार नाही. मात्र हा वर्षभराचा पुरवठा साठवणूक करण्यासाठी जिल्हास्तरावर शेडची गरज भासते. वनविभाग कार्यालयात शेड नसल्याने बांबुची सावठणूक करण्याचा प्रश्न असतो. यासाठी वनविभागाला विशेष निधी देवून शेडची तरतूद करावी. यामुळे पावसाळ्यात पाणी लागून बांबू सडणार नाही आणि कामगारांना वर्षभर बांबू मिळेल. बांबु पुरवठ्यातील अनियमितता व साठवणुकीची समस्या असल्याने येथील आदिवासी बांबू कामगारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. याकरिता जिल्हा नियोजन आराखड्यात आवस्यक निधीची तरतूद केल्यास हा प्रश्न त्वरीत निकाली लागेल. यावेळी शेकडो बुरड कामगार उपस्थित होते. शिष्टमंडळात आदिवासी विकास परिषदेचे शरद आडे, अंजना आडे, मुकुंद मसराम, रामकली कोडापे, मुक्ता सिडाम, रत्ना सडमाके, ज्योति मसराम, छाया उईके, रेणुका मसराम, गीता कोहचडे आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)