शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाळू घाटबंदीने शासनही अडचणीत; विकासकामे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:41 IST

शासनाने निवडणुकीपूर्वी विकासकामांचा सपाटा सुरू केला, त्याच्याच आधारे मतदारांनी मताचे दान देत पुन्हा सत्ता सोपविली. आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आचारंसहितेत अडकलेली कामे पूर्ण करण्याचा खटाटोप चालविला आहे.

ठळक मुद्दे मंगळवारी होणार सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने निवडणुकीपूर्वी विकासकामांचा सपाटा सुरू केला, त्याच्याच आधारे मतदारांनी मताचे दान देत पुन्हा सत्ता सोपविली. आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आचारंसहितेत अडकलेली कामे पूर्ण करण्याचा खटाटोप चालविला आहे. मात्र, वाळूघाट बंदीमुळे वाळू मिळणे कठीण झाल्याने ही विकासकामे करायची कशी, असा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधींना पडला आहे. एकीकडे निवडणुका तोंडावर आहे तर दुसरीकडे वाळू नसल्याने कामे ठप्प आहेत. अशा स्थितीत शासनच आता अडचणीत आले आहे.शासनाला सर्वाधिक महसूल हा गौण खनिजामधून मिळतो. वर्धा जिल्ह्यातील केवळ वाळूघाटाच्या लिलावातून शासनाला पावणेसात कोटींचा महसूल मिळाला. राज्यभरातील घाटांचा विचार केला तर कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाला मिळतो. वाळू उपलब्ध झाल्यास विकासकामांना गती येऊन बांधकामाचाही आलेख वाढतो. त्याचा परिणाम गवंडी कामगार, विटभट्टी कामगार आणि बाजारपेठेवरही पडतो. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २०१८ जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने राज्यभरातील वाळूघाट लिलावावर बंदी घालण्यात आली. परिणामी, वर्षभर सर्व घटकांवर याचा परिणाम होऊन अनेकांवर उपसमारीचीही वेळ आली. त्यानंतर ७ डिसेंबर २०१८ च्या आदेशानुसार ही बंदी उठवून २०१८-१९ करिता वाळूघाट लिलावाला मुभा देण्यात आली. तसेच ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत वाळूघाटांचे लिलाव करण्याचीही न्यायालयाने अनुमती दिली होती. त्यामुळे राज्यातील काही घाटांचे लिलाव करण्यात आले. त्याच्या मोबदल्यात घाटधारकांकडून कोट्यवधी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले. वाळूघाट सुरू झाल्यामुळे कामालाही गती मिळाली होती. पण, पुन्हा जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने लिलाव झालेल्या वाळूघाटावरून उपसा करण्यास स्थगिती देण्यात आली आहे. यावर आता मंगळवारी ४ जूनला सुनावणी होणार असल्याने ही बंद उठते की कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.घाटधारकांच्या गळ्याला लागला फासशासनाकडून वाळूघाटांचा लिलाव केला जातो. या लिलावापोटी घाटधारकांकडून कोट्यवधी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होतात. त्यानंतर स्वाभाविकच घाटधारक दिवसरात्र एक करून भरलेली रक्कम नफ्यासह वसूल करण्यासाठी वाट्टेल ते करतात. त्यातही त्यांच्या नफ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या असंख्य वाटेकरी असतात. याही स्थितीत मशीन व बोट लावण्यावर निर्बंध असल्याने त्याचाही वापर घाटधारक करतात. यावर्षी वर्षभरानंतर घाटांचा लिलाव झाला. लिलावातून कोट्यवधी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले; पण अचानक स्थगिती आल्याने वाळूउपसा थांबलेला आहे. चार दिवसांवर पावसाळा असताना मागील पंधरा दिवसांपासून घाट बंद पडलेले आहेत. एकीकडे कोट्यवधी रुपये गेले, तर दुसरीकडे वाळूही उपसता येत नाही. यामुळे राज्यभरातील वाळूघाटधारक चांगलेच अडचणीत आले आहेत.नवीन वाळू धोरण ठरणार?उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २०१८ मध्ये दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात ३ व १७ आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या आदेशावरून २०१८-१९ च्या वाळू लिलावाला स्थगिती दिली होती. मात्र, ७ डिसेंबर २०१८ रोजीच्या सुनावणीत शासनाच्यावतीने नवीन वाळू निर्गती धोरण तयार करून मे २०१९ च्या पहिल्या आठवड्यात उच्च न्यायालयात दाखल करण्याचे आश्वासित केले होते. याच पार्श्वभूमीवर वाळूघाट लिलाव करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, पुन्हा याचिका दाखल झाल्याने यावर स्थगिती देण्यात आली. याच काळात लोकसभा निवडणुका असल्याने यावर निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आता छत्तीसगड आणि मध्यप्रदेशच्या धर्तीवर नवीन वाळू धोरण ठरण्याचीही शक्यता आहे.असे असेल नवीन धोरणया नवीन वाळू निर्गत धोरणानुसार वाळूघाट हा लिलाव प्रक्रि येतून दोन ते तीन वर्षांकरिता लिजवर देण्यात येणार आहे. त्या गावाच्या विकासाची, अंतर्गत रस्त्यांची तसेच वाळूघाटाची संपूर्ण जबाबदारी सोपविली जाणार आहे. त्यामुळे यात गावांचाही विकास साधला जाईल आणि घाटधारकालाही आधार मिळेल. विशेष म्हणजे, चोरीचे प्रमाण कमी होऊन घाटधारकांच्या उत्पन्नाची होणारी गळती थांबेल तसेच वाळूचे वाढलेले दरही नियंत्रणात राहिल.

टॅग्स :Governmentसरकार