शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

मतदार जनजागृतीसाठी प्रशासनही आघाडीवर

By admin | Updated: September 25, 2014 23:28 IST

लोकशाही बळकट करण्याकरिता संपूर्ण मतदारांनी मतदानाचा घटनादत्त अधिकार बजावणे गरजेचे आहे; पण आजपर्यंत देशात कुठेही १०० टक्के मतदान झालेले नाही़ यामुळे निवडणुकीच्या निकालांवर मोठा

प्रशांत हेलोंडे - वर्धालोकशाही बळकट करण्याकरिता संपूर्ण मतदारांनी मतदानाचा घटनादत्त अधिकार बजावणे गरजेचे आहे; पण आजपर्यंत देशात कुठेही १०० टक्के मतदान झालेले नाही़ यामुळे निवडणुकीच्या निकालांवर मोठा प्रभाव पडत असून असे मतदान कुण्या एका पक्षाच्या पत्थ्यावर पडत असल्याचा आजवरचा अनुभव आहे़ यामुळे केंद्रीय तसेच राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार जनजागृती अभियान तसेच मतदार नोंदणी अभियान राबविण्याची सक्ती केली जाते़ असे असले तरी गत कित्येक वर्षांपासून मतदानाची टक्केवारी ९० च्या वर गेल्याचे ऐकीवात नाही़वर्धा विधानसभा मतदार संघात चार मतदार संघ असून सुमारे १० लाख ६ हजार २२ मतदार आहेत़ यात वर्धा विधानसभा मतदार संघामध्ये २ लाख ८१ हजार ६, आर्वीमध्ये २ लाख ४७ हजार ५६, देवळीमध्ये २ लाख ४६ हजार ८६३ तर हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये २ लाख ५९ हजार ५७८ मतदार आहेत़ यामुळे पुरूषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाणही जवळपास ९० टक्के आहे़ शिवाय ३० हजारांवर नवीन मतदारांची जिल्ह्यात नोंदणी करण्यात आलेली आहे़ सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, यासाठी निवडणूक आयोग आणि निवडणूक विभागाद्वारे कित्येक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न होत आहेत; पण या प्रयत्नांना अद्यापही यश आल्याचे दिसत नाही़ २००९ च्या निवडणुकीत जिल्हाभर जनजागृती कार्यक्रम राबविल्यानंतरही सरासरी ६५ टक्के मतदान झाले़ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी गाठता आलेली नाही़ असे असले तरी या निवडणुकीनंतर सत्ताबदल अनुभवता आला़ मतदानाची टक्केवारी वाढली तर राजकारणात उलथापालथ होते, हे सर्वविदीत आहे; पण प्रयत्न करूनही १०० टक्के मतदान होत नसल्याचे सत्य नाकारता येत नाही़ लोकसभा २०१४ च्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली़ शिवाय जागोजागी पथनाट्यातून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले़ घरोघरी बुथ लेव्हल आॅफीसरच्या माध्यमातून मतदार चिठ्ठ्या पोहोचवून मतदान करण्याचा आग्रह धरण्यात आला; पण त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसले नाही़ आता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठीही राज्य निवडणूक आयोग, निवडणूक विभाग व संपूर्ण प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदार जनजागृती अभियान सुरू केले आहे़ यात जागोजागी मोठे फलक लावण्यात आले असून मतदानाचा हक्क बजावण्याचा आग्रह धरण्यात आला आहे़ वर्धा शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सामान्य रुग्णालय तसेच निवडणूक विभागाच्यावतीने ‘पोस्टर वॉर’च सुरू करण्यात आले आहे़ लोकसभा निवडणुकांपूर्वीही वर्धा शहरासह संपूर्ण लोकसभा मतदार संघात अशा प्रकारची जनजागृती करण्यात आली होती़ या कार्यात राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्वच विभागांनाही जुंपण्यात आले होते; पण फार फरक पडला नव्हता़ आता किमान विधानसभा निवडणुकीत तरी १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत़ मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यशाळाही घेतली जात आहे़ शिवाय पोस्टर, सह्यांची मोहीम आदी अनेक माध्यमांतून जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत़ विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ मतदारांना जागृत करून मतदानाच्या टक्केवारीचे उद्दीष्ट गाठता यावे, यासाठी निवडणूक विभागासह प्रत्येक शासकीय कार्यालय प्रयत्न करीत आहे़ यासाठी शहरात जागोजागी लावलेले फलक जागृती युद्ध सुरू असल्याचा भास निर्माण करणारेच ठरत आहे़ याचा मतदारांवर किती परिणाम होतो, हे मात्र पाहण्याजोगे राहणार आहे़ चारही विधानसभा मतदार संघात अडीच लाखांवर मतदार असून १०० टक्के मतदान झाल्यास चित्र पालटण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात़ जनजागृती मोहिमेला यंदा किती यश येते, हे दि़ १५ नंतरच कळेल!