शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शंभर कोटी मिळाले; जिल्हा बॅँकेचे विलिनीकरण कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:45 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने बँकेचे दिवाळे निघाले. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहे. त्यामुळे या बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करावे, अशी.....

ठळक मुद्देभोयर यांचा प्रश्न : राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने बँकेचे दिवाळे निघाले. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहे. त्यामुळे या बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करावे, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी लाऊन धरल्याने बँकेच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. परंतु राज्य सहकारी बँकेने शासनाकडे १०० कोटीची मागणी केली होती. ती मागणीही शासनाने मान्य करीत १०० कोटीचे अर्थसाहाय्य केले. तरीही बँकेचे विलिनीकरण झाले नसल्यामुळे ते कधी होणार? असा प्रश्न आमदार डॉ. पंकज भोयर यांनी राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत उपस्थित केला.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विलिनीकरण प्रक्रियेसदर्भात मुंबई येथे राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर, प्रशासकीय मंडळ समितीचे सदस्य संजय भेंडे व अविनाश महागावकर, व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख उपस्थित होते. या बैठकीत विलिनीकरणासंदर्भात आमदार भोयर यांनी अधिकाºयांशी सविस्तर चर्चा केली.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालकांच्या बेजबाबदार पणामुळे ग्रामीण भागाचा कणा असलेली बँक डबघाईस आली. या जिल्हा सहकारी बँकेचे २ लाख १७ हजार ५३८ ग्राहक असून त्यांचे बँकेकडे ३५५.४४ कोटी रुपये थकले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा घामाचा पैसा त्यांना परत मिळावा तसेच शेतकºयांनाही सहज आणि सुलभरित्या पिककर्ज पुरवठा व्हावा. या करिता जिल्हा सहकारी बँकेच्या विलिनीकरणाची प्रक्रिया जलदगतीने पार पाडवी, अशी सूचनाही आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केली. वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु असून यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मुख्य प्रशासक अनासकर यांनी दिले. त्यामुळे लवकरच बँक पुन्हा चांगल्या स्थितीत येईल, असा आशावादही आमदार डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :bankबँकPankaj Bhoyarपंकज भोयर