शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नगर रचनाकार कार्यालयात गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:39 IST

येथील नगर रचनाकार कार्यालयातील सहायक नगर रचनाकारास २० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक झाली. या कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करून नागरिकांचे काम प्रलंबित ठेवल्याच्या तक्रारी पुढे येत आहे.

ठळक मुद्देअनेकांच्या तक्रारी : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील नगर रचनाकार कार्यालयातील सहायक नगर रचनाकारास २० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक झाली. या कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करून नागरिकांचे काम प्रलंबित ठेवल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. या संदर्भात शेतकरी स्वातंत्र कृती समिती वर्धाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. यात कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने लाचखोरी केली याची जंत्रीच मांडण्यात आली आहे.नागपूर येथील सुशिक्षित बेरोजगार विजय मोटवानी यांनी कारंजा (घा.) तालुक्यातील राजनगाव येथे नाहरकत प्रमाणपत्रासाठी नगर रचनाकार सतीश देशमुख यांना दीड लाख, सहायक नगर रचनाकार लांडोरे याला ७० हजार तर या कार्यालयातील लिपिक योगेश शेंडे याला २५ हजार रुपयांची लाच दिल्याचे जिल्हाधिकाºयांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत कृती समितीने नमूद केले आहे. मांडवा येथील शेतीच्या कामासाठी किशोर किनकर यांच्याकडेही नगर रचनाकाराने सात लाखाची मागणी केली होती. पैसे दिले नाही तर तुमचे काम होणार नाही, असे कारकून योगेश शेंडे याने सांगितल्याचे या तक्रारीत नमूद आहे. लांडोरेला सुशिक्षीत बेरोजगाराकडून रोहणा गावातील पेट्रोलपंपाच्या एनओसीसाठी पैसे घेतानाच अटक करण्यात आली. या कार्यालयात लाचखोरीची घटना उघड झाली असून लेखी तक्रारी देण्यास नागरिक व संघटना सरसावल्या आहे. आता याप्रकरणी सतीश देशमुख व योगेश शेंडे या दोघांना ही निलंबीत करण्याची मागणी शेतकरी स्वातंत्र कृती समितीने निवेदनातून केली आहे.