शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

सालकऱ्यांच्या शोधार्थ बळीराजाची भटकंती

By admin | Updated: March 20, 2015 01:44 IST

गुढीपाडवा तोंडावर आला आहे. या दिवशी शेतकरी त्यांच्या शेतात वर्षभर काम करण्यासाठी सालकऱ्याची नियुक्ती करतात.

विजय माहुरे घोराडगुढीपाडवा तोंडावर आला आहे. या दिवशी शेतकरी त्यांच्या शेतात वर्षभर काम करण्यासाठी सालकऱ्याची नियुक्ती करतात. यंदा मात्र गावातील सोडा जिल्ह्यातील सालकरी मिळणे कठीण झाले आहे. शेतात वर्षभर काम करण्याकरिता आवश्यक असलेल्या सालकऱ्याच्या शोधात शेतकरी जिल्ह्यात व परजिल्ह्यात फिरत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या नववर्षाला गुढी उभारून होत आहे. काही गावात होळी ते मांडवस या काळात वार्षिक मजुरी ठरवून सालकरी म्हणून ठेवण्याची प्रथा आहे, तर तालुक्यातील काही गावात गुढीपाडव्याला नवा सालकऱ्यांचे वार्षिक वेतन ठरवून कामावर शेतमजूर म्हणून रूजू करण्यात येते. सेलू तालुक्यात बागायती शेती असल्याने सालकरी म्हणून राहणाऱ्यांची संख्या कमी आहे. गत काही वर्षाअगोदर छत्तीसगड येथून बहुतांश परिवार रोजगार मिळविण्यासाठी येथे आले होते. ते काही वर्ष येथे राहून रोजमजुरी करायचे. सध्या ते त्यांच्या राज्यात परत गेले. नंतर गोंदिया, भंडारा व बालाघाट या भागातील काही परिवार या तालुक्यात रोजगाराकरिता आले. तेव्हा शेतावरील काम करण्यासाठी मजूर सहज मिळू लागले होते. आता मात्र चित्र बदलले आहे.गत पाच वर्षांच्या काळात मजुरांना सालकरी म्हणून मिळणाऱ्या वेतनापेक्षा विहिरीवरील कामावर, ट्रॅक्टरवरील कामात, तसेच नवनवीन बांधकामावर काम केल्यास अधिक मजुरी मिळू लागली. युवा मजुरी करणाऱ्यांचा कल शेतीकडून दूर झाला. तालुक्यात सुरू असलेल्या मनरेगामुळे मजुरांची शेतावरील कामाकरिता चणचण भासू लागली आहे. सुरू वर्षांत ७० ते ८० हजार रुपये वार्षिक मजुरी सालकऱ्यांची होती. यात कमी जास्त वेतन असले तरी महिन्याला ५ कुडव ८४० पायली गहू देण्याची प्रथा आहे.यावर्षी अस्मानी व सुलतानी संकटामुळे आर्थिकदृष्ट्या हवालदिल असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे सालकरी ठेवण्याचा प्रश्न कायम असला तरी शेती तर कसावीच लागणार. बैलजोडी ठेवावीच लागणार. सालकऱ्यांची नितांत आवश्यकता असल्याने आपल्या स्वखर्चात कपात करून नव्या सालकऱ्यांच्या शोधार्थ या तालुक्यातील सधन शेतकरी परजिल्ह्यात भटकंती करीत आहेत.