शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या बांधकामात गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:59 IST

येथील रामनगर वॉर्डात न.प.च्या देखरेखीत तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात कंत्राटदार मनमर्जी करीत असल्याने शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देरामनगरातील प्रकार : कामचा दर्जा निकृष्टची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील रामनगर वॉर्डात न.प.च्या देखरेखीत तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामात कंत्राटदार मनमर्जी करीत असल्याने शासनाचा निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी झालेली काम दर्जाहीन असल्याने कंत्राटदार देखरेखीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना अंधारात तर ठेवत नाही ना, अशी चर्चा परिसरात होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आहे.रामनगर वॉर्डात सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. हे विकास काम स्थानिक न.प.च्या देखरेखीत होत आहे. या रस्त्याच्या बांधकामाचा ठेका देण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून शासनाच्या नियमांना बगद देत मनमर्जीने काम केले जात आहे. त्याकडे पालिकेतील अभियंत्यांचेही दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असून त्यासाठी शासनाचा मोठा निधीही प्राप्त झाला आहे. परंतु, दर्जाहीन काम झाल्यास अल्पावधीतच रस्त्याची दैनावस्था होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सिमेंट रस्त्याच्या बांधकामादरम्यान चांगल्या गुणवत्तेचे सिमेंट, रेती व सळाखींचा वापर होणे गरजेचे आहे. परंतु, येथे रेती ऐवजी माती सारखी चुरीचा वापर केल्या जात आहे. त्याबाबत काही सुजान नागरिकांकडून विचारणा करण्यात आली असता उडवा-उडवीचे उत्तरे देऊन वेळ काढू धोरण अवलंबिण्यात आले. इतकेच नव्हे तर पालिकेच्या अभियंत्यांना विचारा करण्यात आली असता रेती उपलब्ध नसल्याने चुरीचा वापर होत असल्याचे त्यांनी काही सुजान नागरिकांना सांगितले. त्यांच्याकडून देण्यात आलेली ही माहिती अप्रत्यक्ष भ्रष्टाचाराला खतपाणी देणारेच असल्याचा आरोप उपविभागीय महसलू अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. निवेदन देताना विकी वाघमारे, अमर बन्सोड, अमर बकाने, अमोल जगताप, अ‍ॅड. संजय जामुनकर, आशीष खेडकर, तेजस डेपे, अभय दारोंडे, कुणाल जांभुळकर, हर्षल बोरकर, सुरज गावंडे, जयपाल तामगाडगे, कुणाल जाभुंळकर, नितेश वावरे, झिलटे आदी हजर होते.