शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

दर कमी होऊनही निविदेमध्ये गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नगरपंचायतने एलईडी लाईटसाठी काढलेली निविदा सन २०१७-१८ च्या नवीन सीएसआर यादीने प्रकाशित होवून सुद्धा सदर निविदा दर जास्त असलेल्या जुन्या सीएसआरने काढल्यामुळे निविदा रद्द होवून नवीन सुधारित दराने निविदा काढण्याची मागणी भाजपा नगरसेवक अ‍ॅड. मनीष ठोंबरे, नगरसेवक सुरेश काळबांडे यांनी केली आहे. या बाबतचे निवेदन ...

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांना निवेदन : एजंसीला ३ लाखांचा फायदा करून दिल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नगरपंचायतने एलईडी लाईटसाठी काढलेली निविदा सन २०१७-१८ च्या नवीन सीएसआर यादीने प्रकाशित होवून सुद्धा सदर निविदा दर जास्त असलेल्या जुन्या सीएसआरने काढल्यामुळे निविदा रद्द होवून नवीन सुधारित दराने निविदा काढण्याची मागणी भाजपा नगरसेवक अ‍ॅड. मनीष ठोंबरे, नगरसेवक सुरेश काळबांडे यांनी केली आहे. या बाबतचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.एलईडी लाईटच्या निविदामध्ये सभागृहातील चर्चेच्या आधीच बऱ्याच भानगडी करुन ठेवल्या आहे. नामांकित कंपन्याचे दर व अटी सुलभ असताना सत्ताधारी भलत्याच अटींवर अडून बसले आहेत. नवीन अंदाजपत्रकाचे दर लागू झाल्यावर ई-निविदा निघाली, असे असताना जुन्या दराने मंजुरी देण्याची गरज नव्हती. त्यामुळे तब्बल ३ लाखाचा फायदा एजंसीला मिळून देत शासनाच्या तिजोरिलाच चुना लावला असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. आर्वी येथील कदम नावाच्या कंत्राटदारालाच सदर निविदा मिळावी म्हणून नगरपंचायतीने अटी घातल्या होत्या. सदर अटींची पुर्तता त्यांनी केली नाही. तरीही निविदा त्यांनाच का? याचे उत्तर नगरपंचायत प्रशासनाने सभागृहात देण्याची मागणी नगर सेवक अ‍ॅड. मनीष ठोंबरे यांनी केली आहे. एवढे सगळे करुनही लाईटचे देयक काढल्यास जनहित याचिका दाखल करण्यात येईल. या प्रकरणी तात्काळ चौकशी करुन दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.३५० एलईडी लाईट लावण्यातही गोलमालशहरात सार्वजनिक रस्ते, चौक, मंदीर, शासकीय कार्यालयसह सार्वजनिक ठिकाणी जास्त प्रकाश पडावा म्हणून लाईट लावायचे सोडून सत्ताधारी कुठेही मनमानी करुन लाईट लावत आहेत. जेथे लाईट नाही तेथे लाईट लावण्याचे सोडून एकाच ठिकाणी जुना व नवीन लाईट लावण्याचा प्रकार केल्या जात आहे, असा आरोपही निवेदनातून केला आहे.