शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गांधी आश्रमात पारंपरिक पद्धतीने झाले गोधनाचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

सेवाग्राम येथील जुन्या वस्तीत गोवर्धन पूजनाचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे पूर्वी या परिसरात मोठ्या संख्येने गोवंश होते. पण यंदाच्या वर्षी मोजक्याच पशुपालकांकडे गोवंश असल्याचे दिसून आले. शंकर कुमरे, सुभाष नेहारे आणि नामदेव मडावी यांनी पारंपरिक पद्धतीने आकर्षक सजविण्यात आलेल्या गाईंची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. गावातील मंदिरात विधिवत पूजा करून मेडिकल चौकातील मंदिरात अखेरचे पूजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : येथील गांधी आश्रमात आश्रम प्रतिष्ठानच्या गोशाळा विभागाच्या वतीने दिवाळी पाडवा तसेच बलिप्रतिपदाचे औचित्य साधून गोधनाचे पूजन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. आकर्षक सजविण्यात आलेल्या गोवंशांना पुरणाचा नैवेद्य दाखविण्यात आला. इतकेच नव्हे तर या प्रसंगी सादर करण्यात आलेल्या एकापेक्षा भजनांसह गाण्यांमुळे उत्सवातील उत्साह द्विगुणित झाला होता.कार्यक्रमादरम्यान अमृताहूनी गोड, है प्रार्थना गुरू देव की, अबीर गुलाल उधळीत रंग, चल चल आपल्या गावाला राहू नको तू शहराला, आदी बहारदार गाणी सादर करण्यात आली. गायकांना शंकर शेंद्रे, जालंधरनाथ, नीलेश आळणकर, सुधाकर शेंडे, नामदेव ढोले, ओम गुरुनुले, बाबा खैरकर, गजानन गुरनुले आदींनी साथसंगत दिली. विजय धुमाळे यांनी आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाला शोभा कवाडकर, सदा मून, सुनीता परचाके, सावित्री सनत, रवी गोंळकर, मारुती गुरनुले, संगीता चव्हाण, अश्विनी बघेल, प्रभा शहाणे, माधुरी चांभारे, जयश्री पाटील, डॉ. शिवचरण ठाकुर, सचिन हुडे, आकाश लोखंडे, सचिन बहादुरे, शंकर वाणी, जानराव खैरकर, सुधाकर खानझोडे, नामदेव बघेकर, सुधाकर काळे, सुनील फोकमारे, सपना कार्डेकर, राणी मून, शर्मिला लोखंडे, संजय आत्राम,    सुभाष ताकसांडे आदींची उपस्थिती होती. 

जुन्या वस्तीत घटली गोवंशांची संख्या

- सेवाग्राम येथील जुन्या वस्तीत गोवर्धन पूजनाचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे पूर्वी या परिसरात मोठ्या संख्येने गोवंश होते. पण यंदाच्या वर्षी मोजक्याच पशुपालकांकडे गोवंश असल्याचे दिसून आले. शंकर कुमरे, सुभाष नेहारे आणि नामदेव मडावी यांनी पारंपरिक पद्धतीने आकर्षक सजविण्यात आलेल्या गाईंची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. गावातील मंदिरात विधिवत पूजा करून मेडिकल चौकातील मंदिरात अखेरचे पूजन करण्यात आले. असे असले तरी सेवाग्राम जुन्या वस्तीत गोवंशांची संख्या बऱ्यापैकी घटल्याचे दिसले.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Sewagramसेवाग्राम