शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
8
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
9
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
10
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
11
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
12
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
13
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
14
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
15
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
16
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
17
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
18
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
19
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
20
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली गो-कार्ट रेसिंग कार

By admin | Updated: May 21, 2016 02:13 IST

सेवाग्राम येथील बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गो-कार्ट ही कार तयार केली. ‘नो पोल्युशन नो साऊंड’

हैदराबाद येथील आॅल इंडिया आयएसके सिरीज आॅफ कारटिंगमध्ये नोंदविला सहभागवर्धा : सेवाग्राम येथील बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गो-कार्ट ही कार तयार केली. ‘नो पोल्युशन नो साऊंड’ अशा या कारने हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीयस्तरावरील आय.एस.के. सिरीज आॅफ कारटींग इव्हेंटमध्ये सहभागी होत अंतिम फेरीत धडक मारली. या विद्यार्थ्यांनी या कामगिरीसह महाविद्यालयाचे व राज्याचेही नाव उंचावले आहे. स्पर्धेत देशभरातून ५० स्पर्धक सहभागी झाले होते. तर महाराष्ट्रातून केवळ चार स्पर्धकांना प्रवेश मिळाला. मेकॅनिकल इंजि. विभागातील मेकट्रॉन क्लबचे प्रणय बोकडे, संकेत चौधरी, आदित्य कंत्रोजवार, विशाल मोरे, निरज अगदारी, विकीन काळे, भूषण बावनकुळे, तन्मय अग्रवाल, अक्षय रूद्रकार अशी या विद्यार्थ्यांनी नावे आहेत. गो-कार्ट (सिंगल सिटर आय.सी. इंजीन आॅपरेटेड फोर व्हिलर कार) या रेसिंग कारविषयी माहिती देतांना मेट्रॉन क्लबचे प्रणय बोकडे व संकेत चौधरी म्हणाले की, मेकॅनिकल इंजिनिअरींग म्हणजे केवळ थेरॉटिकल ज्ञान नसून प्रात्यक्षिकावर भर द्यावा लागतो. विविध यंत्राची माहिती वाचून होत नाही तर प्रत्यक्ष त्यावर प्रयोग करावा लागतो. हाच दृष्टीकोन ठेऊन आम्ही रेसींग कार बनविण्याचा निश्चिय केला. कार डिझाईन, स्पेअर पार्टस अशा विविध बाबी तपासल्या आणि निर्मितीची सुरूवात केली. मेकॅनिकल विभागाचे प्रा. रजत डाहाके, प्रा. एस.माने यांनी मार्गदर्शन केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.रेसींग कारचे निकषानुसार कारची निर्मिती केली. राईट बार, फ्युअल टँक, रॉ मटेरिअरल अशा पार्टसची जुळवणी केली. १२५ सीसीचे इंजीन, चार गिअर, ताशी ७० कि़मी. वेग अशी कारची वैशिष्ट्ये आहे. ‘नो पोल्युशन नो साऊंड’ अशी ही रेसिंग कार आहे. आसनाच्या बाजूला इंजीन, उंची, वजन अशा सर्व नियमांची पूर्तता केली आहे. तांत्रिकदृष्ट्या ही कार सक्षम असल्याचे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)