शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाविरोधात न्यायालयात जाणार

By admin | Updated: April 18, 2017 01:18 IST

वर्धेलगतच्या ११ ग्रामपंचायतीतील अवैध बांधकामाचा मुद्दा चांगलाच गाजला.

प्रमोद मुरारका यांची पत्रपरिषद वर्धा: वर्धेलगतच्या ११ ग्रामपंचायतीतील अवैध बांधकामाचा मुद्दा चांगलाच गाजला. यात पोलीस प्रशासनाकडून केलेल्या कारवाईत सरंपचांसह काही ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित व्हावे लागले. असे असताना जिल्हा परिषद प्रशासनाला माहिती अधिकारात मागविलेली माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. यामुळे प्रशासनाविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती प्रमोद मुरारका यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या प्रकरणासंदर्भात नुकतीच माहिती आयोगासमोर सुनावणी झाली. यावेळी माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटविकास अधिकारी इसाये यांना आयोगाने चांगलेच फटकारल्याचे त्यांनी परिषदेत सांगितले. शिवाय या प्रकरणात चौकशी सुरू असून पोलीस प्रशासनाकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप इसाये यांनी केला. यावर आयोगाने या प्रकरणासंदर्भात होणाऱ्या सुनावणीला पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलाविण्यात येईल असे सांगितले. तसेच तक्रार दाराच्या अर्जाप्रमाणे त्या ४ हजार घरांची कागदपत्रे गहाळ झाल्याने पोलीस तक्रार करा व दोषी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. येत्या १५ दिवसात संपूर्ण घटनाक्रम शपथपत्रावर आयोगासमोर सादर करावा व त्याची प्रत तक्रारदाराला देण्यात यावी. या प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सादर करावा तसेच तक्रारदाराने मागितलेली माहिती तत्काळ द्यावी. ती देण्यास टाळाटाळ केल्यास प्रशासनाना दंडीत करण्यात येईल, असे आदेश देण्यात आल्याचे मुरारका म्हणाले.(प्रतिनिधी) संजय मीना यांच्या विरोधात याचिकाजिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांच्याकडून या प्रकरणात झालेल्या अनागोंदीबाबत वर्धा न्यायालयात याचिका दाखल केल्याचे प्रमोद मुरारका म्हणाले.