शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला किमान जगण्याइतपत पेन्शन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:38 IST

भाजप सरकारने निवडून येण्यापूर्वी पेंशनवाढीचे आश्वासन दिले; पण ते अद्याप पूर्ण केले नाही. यामुळे आपल्याला तीव्र लढा देण्यास लाखोंच्या संख्येने दिल्लीच्या रामलीला मैदानावर एकत्र होऊन सरकारी झोप उडविण्याशिवाय गत्यंतर नाही.

ठळक मुद्देप्रकाश येंडे : राष्ट्रीय निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : भाजप सरकारने निवडून येण्यापूर्वी पेंशनवाढीचे आश्वासन दिले; पण ते अद्याप पूर्ण केले नाही. यामुळे आपल्याला तीव्र लढा देण्यास लाखोंच्या संख्येने दिल्लीच्या रामलीला मैदानावर एकत्र होऊन सरकारी झोप उडविण्याशिवाय गत्यंतर नाही. आम्हाला किमान जगण्याइतकी पेंशन सरकारने द्यावी व भगतसिंग कोशीयारी अहवालानुसार तीन हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी केली.स्थानिक माता मंदिर सभागृहात राष्ट्रीय निवृत्त कर्मचारी समन्वयक समिती हिंगणघाटद्वारे पेन्शन धारकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अतिथी म्हणून राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव डोंगरे, सचिव पुंडलिक पांडे उपस्थित होते. याप्रसंगी डोंगरे यांनी संघटनेच्या स्थापनेपासून झालेल्या वाटचालीचा आढावा घेतला. पेन्शन धारकांच्या किमान पेन्शन वाढीसाठी सरकार दरबारी चालू असलेल्या वाटचालीबद्दल माहिती दिली. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी दिली येथे रामलीला मैदानावर आमरण, उपोषण, आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.पांडे यांनी सध्या मिळणाºया पेन्शनमध्ये पती-पत्नीचे जीवन जगणे कसे कठीण झाले आहे, याबाबत अनेक उदाहरणे देत सरकारी कर्मचारी तुपाशी व पेन्शनर उपाशी, अशी वास्तविकता प्रतिपादित केली.पेन्शन मेळाव्याला मोठ्या संख्येने पेन्शनधारक उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक रमेश झाडे यांनी केले. संचालन गोपाल व्यास यांनी केले तर आभार गजानन कारामोरे यांनी मानले. मेळाव्याला बाबाराव ठाकरे, गजानन कारामोरे, रमेश झाडे, उमेश पराते, विठ्ठल चनेकार, कापसे आदींनी सहकार्य केले.