शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव दुर्घटनेतील जवानांना शहिदांचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:49 IST

पुलगाव येथील दारूगोळा भांडारात झालेल्या दुर्घटनेत १९ जवान शहीद झाले होते. त्यांना शहिदांचा दर्जा बहाल करून त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सोई सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली. खा. तडस लोकसभेत बोलताना म्हणाले की, पुलगाव येथे लष्कराचे देशातील सर्वात मोठे दारुगोळा भांडार आहे.

ठळक मुद्देतडस यांची लोकसभेत शून्य प्रहरात मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलगाव येथील दारूगोळा भांडारात झालेल्या दुर्घटनेत १९ जवान शहीद झाले होते. त्यांना शहिदांचा दर्जा बहाल करून त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सोई सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली. खा. तडस लोकसभेत बोलताना म्हणाले की, पुलगाव येथे लष्कराचे देशातील सर्वात मोठे दारुगोळा भांडार आहे.हा परिसर २८ किलोमीटरचा आहे. आशिया खंडातील दुसरं सर्वात मोठं शस्त्रास्त्र भांडार म्हणून त्याची ओळख आहे. पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला ३१ मे २०१६ च्या मध्यरात्री अचानक आग लागून झालेल्या भीषण स्फोटांमध्ये १९ जवानांना प्राण गमवावे लागले. ही आग विझवताना आगीत ले. कर्नल आर.एस.पवार आणि मेजर मनोज या वरिष्ठ अधिकाऱ्यांंसह ६ जवान व अग्निशमन विभागातील १३ जवानांना प्राण गमवावे लागले. या आगीमध्ये शहीद झालेल्या जवानांना शहीदांचा दर्जा देण्यात यावा या करिता खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत शून्य काळात प्रश्न उपस्थित करून केंद्रशासनाचे लक्ष वेधले.अग्निशमन विभागातील जवानांना राष्ट्रपती फायर अवार्ड प्रदान करण्यात आला असुन शहीद झालेल्या जवानांना शहीदांचा दर्जा देण्यात यावा, तसेच परिवारातील एका सदस्याला अनुकंपाच्या आधारावर सरकारी नोकरी देण्यात यावी व परिवाराला युद्धातील शहीदांना ज्या सोयी सुविधा देण्यात येतात त्या सर्व सरकारी सुविधा देण्यात याव्या अशी मागणी खा. तडस यांनी केली.सीएसआर फंडातून परिसरात विकास कामे सक्तीची कराकेंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशानुसार सीएसआरकरिता पात्र कंपनीला आपल्या सामाजिक दायित्वातून विविध सात विषयावर निधी देण्याचा अधिकार असतो. सदर निधीचे वाटप करीत असतांना ज्या जिल्ह्यात, परिसरात व विभागामध्ये कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या परिसरावर सीएसआर अंतर्गत निधी खर्च करण्याकरिता कंपन्यांनी अनिवार्य आहे. सीएसआरचा पहिला अधिकार हा स्थानिक परिसरालाच आहे ,असे उत्तर वाणिज्य राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिले.सीएसआर या सामाजिक दायित्वातून खर्च करण्यात येणाºया निधीसंदर्भात खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न संख्या १२२ अंतर्गत मुद्दा उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या पुरवणी प्रश्नांवर केंद्रीय वाणिज्य मंत्री यांनी लोकसभेत उत्तर दिले. ज्या कंपन्या सीएसआर निधी योग्य रीतीने खर्च करीत नाही. अशा कंपन्यांवर सीएसआर नियम अंतर्गत नमुद असलेल्या तरतुदीप्रमाणे वेळोवेळी कार्यवाही केली जाते, असे त्यांनी सांगितले.वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात यावर्षी मोठया प्रमाणात पाणी समस्या उद्भवलेली असून परिसरातील व नागपूर विभागातील कंपन्यांनी पाणी विषयाकरिता आपले योगदान द्यावे अशी प्रमुख मागणी देखील खा. तडस यांनी केली. वाणिज्य राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी वर्धा लोकसभा मतदार संघातील सीएसआर विषयी सर्व विषय प्राधान्याने सोडविण्याकरिता वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने मदत करण्यात येईल असे त्यांनी खा. तडस यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.