शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला प्रती क्विंटल सात हजार रूपये भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:09 IST

सततची नापिकी व शेतमालाला मिळणारा अल्प भाव यामुळे आदींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देमनसेची मागणी : कृषी अधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सततची नापिकी व शेतमालाला मिळणारा अल्प भाव यामुळे आदींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या कापसाला सात हजार व सोयाबीनला पाच हजार रूपये प्रती क्विंटल भाव देण्यात यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांनी कृषी अधिकाºयांना दिलेल्या निवेदतून केली आहे.राज्यातील शेतकरी बांधवांसोबत शासन धोकेबाजीच करीत आहे. सेलू बाजार समितीत २८ आॅक्टोबरला सोयाबीन अल्पदाराने खरेदी केले. शासनाने हमीभाव ३ हजार ५० जाहीर केला आहे; पण २०० ते २ हजार रूपयांच्या फरकाने खरेदी केली जात आहे. व्यापारी सुद्धा शेतकºयांची एकप्रकारे लुटच करीत आहे. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकार विरोधात शेतमालाच्या भावा संदर्भात आंदोलने केली होती. पण, आताचे भाजपा सरकार गप्प बसून असल्याचा आरोप वांदिले यांनी निवेदनातून केला आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाले. अनेक शेतकºयांचा लागवड खर्च निघणे कठीण आहे. यामुळे कापसाला सात हजार व सोयाबीनला पाच हजार रूपये भाव देण्यात यावा. हमभावानुसार शेतमालाची खरेदी करा, कृषीपंपाचे भारनियमन त्वरित बंद करा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलमध्ये हिंगणघाट, समुद्रपूर भागातील शेतकºयांना घेऊन तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदन देताना अमोल बोरकर, सुभाष चौधरी, किशोर चांभारे, गोमाजी मोरे, लक्ष्मण सावरकर, सुधाकर वाढई, रमेश घंगारे, जयंता कातरकर, राहुल सोरटे, जगदीश वांदिले, हेमंत घोडेस, कवडू ब्राह्मणे, प्रल्हाद तुराळे, किशोर भजभुजे, अमोल मुडे, गजानन कलोडे, धनराज शंभरकर, सुनील शेंडे, आकाश डंभारे, प्रकाश भलमे, सुशील घोडे, आकाश जुमडे, सचिन वाघे आदी उपस्थित होते.