शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीधारकांना स्थायी घरपट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:05 IST

शहरातील पुलफैल, आनंदनगर, अशोकनगर, तारफैल येथील झोपडपट्टीधारकांनी एकत्र येत राष्ट्रीय सम्बुद्ध संघटनेच्या नेतृत्त्वात स्थानिक पुलफैल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून झोपडपट्टीधारकांना जागेचे कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी रेटली. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचल्यावर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर मोर्चा : राष्ट्रीय सम्बुद्ध संघटनेचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील पुलफैल, आनंदनगर, अशोकनगर, तारफैल येथील झोपडपट्टीधारकांनी एकत्र येत राष्ट्रीय सम्बुद्ध संघटनेच्या नेतृत्त्वात स्थानिक पुलफैल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून झोपडपट्टीधारकांना जागेचे कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी रेटली. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचल्यावर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.इंग्रज काळात हा संपूर्ण परिसर जनावरे चराईसाठी देण्यात आला होता. परंतु, गौरक्षण मंडळाने ही जागा विकण्याचा आदेश चॅरिटी कमिशनर यांच्याकडून घेऊन सदर जागा विकण्यास सुरूवात केली आहे. सन १०७६ मध्ये चॅरिटी कमिशनर यांनी ही जागा विकता येणार नाही असे स्पष्ट केले होते. परंतु, जागा नंतरच्या आदेशावरून विकल्या जात असल्याचा हा प्रकार पूर्वीच्या आदेशाला बगल मिळत आहे. शिवाय नवीन आदेशानुसार २० पैसे प्रती चौ.फु. विकण्याचे आदेश दिले होते. मात्र, सदर मंडळाकडून १ रुपये दराने जागा विकण्याचा सपाटाच लावण्यात आला. सध्या सर्व नियमावलींना फाटा देत जागा विकण्याचा प्रकार सुरू आहे. ज्या लोकांना जागा विकण्यात आली त्यांना वेगवेगळी आखिव पत्रिका न देता एकाच आखिव पत्रात त्यांची नावे समाविष्ट करण्यात आले आहेत. जागेची मोजणी करणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.सदर जागेबाबत जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने विचार करून तात्काळ योग्य कार्यवाही करीत तेथील झोपडपट्टीधारकांना कायम स्वरूपी जमिनीचे पट्टे द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनाचे नेतृत्त्व शारदा झामरे यांनी केले. आंदोलनात भास्कर भगत, संजय बघेल, रत्नमाला साखरे, परवीन शेख, राणी मेश्राम, छबु चहांदे, नंदा कुसळे, कविता राऊत, प्रिया गिरी, गीता आडे, सईदा शेख यांच्यासह पुलफैल, आनंदनगर, अशोकनगर, तारफैल येथील झोपडपट्टीधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.