शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना नवीन नियमानुसार बोनस द्या

By admin | Updated: October 29, 2015 02:34 IST

केंद्र सरकारने पारीत केलेल्या विधेयकातील कलम १२ मध्ये कारखाना कामगारांना सात हजार रूपये बोनस देण्यात यावे अशी तरतुद केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना पत्र : हजारो कामगार वंचितहिंगणघाट : केंद्र सरकारने पारीत केलेल्या विधेयकातील कलम १२ मध्ये कारखाना कामगारांना सात हजार रूपये बोनस देण्यात यावे अशी तरतुद केली आहे. हा निर्णय १ एप्रिल २०१५ पासून लागू करण्यात आला आहे. यात कारखाना कामागारांसाठी बोनसची कमाल मर्यादा सात हजार रूपये करण्यात आली असताना येथील कामगार मात्र या लाभापासून वंचित आहे. याची दखल घेत कामगारांना लाभ मिळवून देण्याची मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका पत्रातून केली आहे.हिंगणघाट व परिसरात लहान-मोठे स्वरुपातील उद्योग आहे. येथे हजारो कामगार काम करतात. त्यांना १ एप्रिल २०१५ पासून लागू केलेल्या सुधारीत कायद्यानुसार सात हजार रूपये बोनस देण्याची तरतुद करण्यात यावी. येथील कामगारांना लाभ मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. यात आर.एस.आर. स्पिनींग अ‍ॅन्ड विव्हींग मिल, हिंगणघाट, गिमाटेक्स इंडस्ट्रिज, हिंगणघाट, गिमाटेक्स इंडस्ट्रिज, वणी, ता. हिंगणघाट, पी.व्ही. टेक्सटाईल्स, जाम, ता. समुद्रपूर, आर.एस.आर. मोहता स्पिनींग अ‍ॅन्ड विव्हिंग मिल्स, बुरकोनी, ता. हिंगणघाट यासह हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील असलेल्या सर्व जिनींग व प्रेसींग युनिट, दाल मील व अन्य उद्योगांचा यात समावेश करण्याची मागणी केली. केंद्र सरकारचे विधेयक लागू असताना त्यांना याच लाभ मिळत नाही. दिवाळीमध्ये कामगारांना मिळणारा बोनस केंद्र सरकारच्या विधेयकानुसार असावा, अशी मागणी पत्रातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या विधेयकातील तरतूदया नियमानुसार ज्या कारखान्यात २० किंवा त्यापेक्षा अधिक कामगार कार्यरत आहे त्या उद्योगासाठी हा नियम केंद्र सरकारने लागू केला आहे. सध्या ही मर्यादा ३ हजार ५०० रूपये आहे. यात सुधारणा करुन १ एप्रिल २०१५ पासून लागू मर्यादा वाढविली आहे. वेतनानुसार दिल्या जाणाऱ्या पात्र बोनसची मर्यादा ही दरमहा १० हजार रूपयांवरून २१ हजार रूपये करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी करण्याची सूचना येथील उद्योगांना देण्यात यावी. दिवाळीच्या सणात याचालाभ कामगांना मिळावा, याकरिता त्वरीत प्रयत्न करण्याची मागणी पत्रातून केली आहे.