शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणासह संगोपनाला महत्त्व द्या

By admin | Updated: May 31, 2017 00:41 IST

५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यंदा ९ लाख वृक्ष लावण्यात येत आहेत.

शैलेश नवाल : यंदाच्या पावसाळ्यात नऊ लाख रोपटी लावणार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यंदा ९ लाख वृक्ष लावण्यात येत आहेत. या वृक्षांच्या रोपणासह त्यांच्या संगोपणाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. जिल्ह्यात वृक्षलागवड कमी झाली तरी चालेल; पण लावण्यात आलेले वृक्ष जगविण्यासाठी नागरिकांसह स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केले. जिल्हाधिकारी नवाल पुढे म्हणाले, ४ जूनला वर्धा शहरात वृक्षलागवडीसाठी महाश्रमदान होणार आहे. यात नागरिकांसह स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत. गत वर्षी लावण्यात आलेले ९३ टक्के वृक्ष वनविभागाने नागरिकांच्या सहकार्याने जगविले आहे. इतर विभागाची टक्केवारी ७७ आहे. यंदा वृक्ष लागवडी सोबतच चारा लागवड करून शिवार हिरवे ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विशेष सहकार्यही मिळणार आहे. शासकीय व महसूल विभागाच्या जमिनीवर वृक्षारोपण करून ते जगविण्याची इच्छा असणाऱ्यांना शासकीय जागेवर विंधन विहीर व संरक्षण भिंत तसेच कुंपण तयार करून दिले जाणार आहे. याकरिता आतापर्यंत ८ ते ९ जणांचे आवेदन प्राप्त झाले आहेत. या उपक्रमात ग्रीन आर्मीच्या ३२ हजार सदस्यांचेही सहकार्य घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. ग्रीन वर्धा करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन हनुमान टेकडीवर व कमळ तलाव परिसरात १५ हजार वृक्ष, पुलगाव सिएडी कॅम्प परिसरात २० हजार वृक्ष लावण्याचे नियोजन आहे. नदी, नाला, तलाव असलेल्या एकूण २५० कि.मी.च्या भागात २ लाख बांबुचे वृक्ष लावण्यात येत आहे. केवळ खड्डे खोदून वृक्ष लावले, असे न होऊ देता नागरिकांसह सामाजिक संघटनांनी व शासकीय विभागाने प्रत्यक्षात वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. जिल्ह्यात झाडांसह चारायुक्त शिवार तयार करावयाचा आहे. वृक्षारोप कमी झाले तरी चालेल; पण लावलेले प्रत्येक झाड जगविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी नवाल म्हणाले. या पत्रपरिषदेला उपवनसंरक्षक दिगंबर पगार, पोलीस उपअधीक्षक (गृह) रवींद्र किल्लेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साबळे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सचे आशीष गोस्वामी आदींची उपस्थिती होती.