शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अनुदानावर शेतीकुंपण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 23:49 IST

तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांची महाकाळी येथे बैठक पार पाडली. या बैठकीत शेतकºयांची पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घालून चर्चा करण्याचे आश्वासन माजी आमदार दादाराव केचे यांनी दिले होते.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी दिले आदेश : दादाराव केचे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांची महाकाळी येथे बैठक पार पाडली. या बैठकीत शेतकºयांची पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घालून चर्चा करण्याचे आश्वासन माजी आमदार दादाराव केचे यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी वर्ध्यात सर्व शेतकऱ्यांची पालकमंत्र्यांशी भेट घालून दिली असता शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. पालकमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा करीत जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेती कुंपण द्या, असे आदेश जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांना दिले.आर्वी तालुक्यातील बोरगाव (गोंडी), सुसुंद, हेटी, सहेली, डबलीपूर, मासोद, काचनुर, महाकाळी, दहेगाव (गोंडी) व लादगड येथील शेतकरी जंगली श्वापदामुळे त्रस्त झाले आहे. एकीकडे निसर्गाचा प्रकोप तर दुसरीकडे जंगली श्वापदांचा उपद्रव यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. शेतीची पेरणी ते काढणीपर्यंत शेतकºयांना जंगलीप्राणी सळो की पळो करुन सोडत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत पिकांना वाचविण्याकरिता चोविस तास शेतात राहावे लागते. परिणामी प्रपंच प्रभावित झाला असून परिवारीक समारंभालाही उपस्थित राहता येत नाही. मुलाबाळांनाही शेतात रखवाली करिता जावे लागत असल्याने त्यांच्याही शिक्षणावर पाणी सोडले जात आहे. कर्ज व उसणवारी पैसे घेऊन पेरलेल्या शेतात पीक वर आले की एक तर निसर्ग किंवा जंगली श्वापदामुळे नष्ट होते. त्यामुळे आता मुला-मुलींचा विवाह, आरोग्य व शिक्षणाचा खर्च क सा करावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जागली करताना शेतकºयांच्या जीवालाही धोका संभावत आहे. या विविध प्रश्नांना शेतकºयांच्या बैठकीत वाचा फोडण्यात आली. त्यामुळे माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात या सर्व शेतकºयांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकºयांनी आपली समस्या मांडत विविध मागणीचे निवेदन दिले. त्यावर पालकमंत्र्यांत्री ‘शेतकºयांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यास शासन कटिबद्ध असून महाराष्ट्र शासनाची तिजोरी सदैव शेतकºयांकरीता उघडी आहे’ असे सांगत शेतकºयांच्या सक्रीय सहभागाने शेताच्या कुंपनासहीत वन विभागामार्फत जंगल सिमांना कुंपन करण्यात येईल. तसेच ७५ टक्के अनुदानावर शेतकºयांना शेत कुंपन उपलब्ध करुन द्यावे, असे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व उप वनसंरक्षक शर्मा यांना दिले. यावेळी माजी आमदार दादाराव के चे यांच्यासह पंचायत समिती सदस्य नितीन अरबट, सहेलीचे माजी सरपंच नरेश तेलंग, विशाल सहाकारी संस्था खरांगणाचे अध्यक्ष मेघराज पेठे, लादगडचे सरपंच शिवशंकर ठाकरे, प्रविण घोळे, काचपूरचे उपसरपंच वाळेकर, बाबाराव कामळे, दहेगाव (गोंडी) चे सरपंच पुरुषोत्तम भड आणि परिसरातील शेतकºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार