शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:02 IST

समृद्धी महामार्गात स्मार्ट न्यू सिटीसाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू होत आहे. यासाठी पुन्हा लँड पुलींगचे तुणतुणे शासन वाजवित आहे. त्याचा विरोध करून स्मार्ट सिटीमध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार भावाच्या पाचपट रक्कम मिळावी.

ठळक मुद्देम. फुले समता परिषदेची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समृद्धी महामार्गात स्मार्ट न्यू सिटीसाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू होत आहे. यासाठी पुन्हा लँड पुलींगचे तुणतुणे शासन वाजवित आहे. त्याचा विरोध करून स्मार्ट सिटीमध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार भावाच्या पाचपट रक्कम मिळावी. विहीर व विद्युत मोटरपंप असलेली शेतजमीन उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करीत कायद्यातील तरतुदीनुसार बाजार भावाच्या १० ते २० पट भाव द्यावा, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केले. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.याबाबत सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांना म. फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, समृद्धी महामार्ग प्रकल्प बाधित संघर्ष समितीचे अ‍ॅड. महेंद्र धोटे, शेतकरी व कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले. राज्य शासनाचा तुकडे बंदीचा ‘फ्रगंट अ‍ॅक्ट’ कायदा आहे. यात शेतजमिनीचे दोन एकरच्या आत तुकडे पाडता येत नाही. असे असताना शासन पुरस्कृत समृद्धी महामार्गात थेट खरेदी पद्धतीने जमीन खरेदी करताना दोन एकरच्या आतील तुकडे तसेच ठेवून शेतकºयांची शेतजमीन खरेदी केली. हे कायद्यानुसार नियमबाह्य आहे. अशा तुकड्यांच्या जमिनीवर शेतकरी काहीही करू शकत नाही. या तुकड्यांना महसूल विभागाची मान्यता नसल्याने त्याचा आर्थिक लाभही शेतकºयांना मिळू शकत नाही. यामुळे हे जे दोन एकरच्या आत शेतजमिनीचे उरलेले तुकडे आहे, ते समृद्धी महामार्ग प्राधिकरणाने त्याच किंमतीत खरेदी करावे. अन्यथा जिल्हाधिकाºयांनी तुकडे बंदीचा कायदा मोडल्याने या समृद्धी महामार्ग प्राधिकरणाला दंड आकारावा. त्यांनी केलेल्या शेती खरेदी अवैध घोषित कराव्या, अशी मागणी करण्यात आली.समृद्धी महामार्गात शेतजमीन गेल्याने विस्थापित शेतकºयांनाही विस्थापितांची भरपाई समृद्धी महामार्ग प्राधिकरणने द्यावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली. या मागण्या मान्य न झाल्यास शेतकºयांना सोबत घेऊन जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, अशा इशारा महात्मा फुले समता परिषद व समृद्धी महामार्ग संघर्ष समितीने संयुक्त निवेदनातून दिला आहे.जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ पिसे, समृद्धी महामार्ग संघर्ष समितीचे अ‍ॅड. महेंद्र धोटे, निळकंठ राऊत, केशव तितरे, संजय भगत, केशव तितरे, जयंत मानकर, कवडू बुरंगे, राजेंद्र झिले, सय्यद अफसर, रोशन इसापडे, दिलीप वंजारी, श्रीकांत वंजारी, राजकुमार मुघडे, लुकेश सावरकर, गोविंद मेहरे, हुमाँयू इकबाल सय्यद, जयवंत कनेरी, भरत चौधरी, सुनील सावध, म्हस्के, कुबडे व शेतकरी उपस्थित होते.ओलिताच्या जमिनीस १० ते २० पट दर गरजेचेशेतात विहिरींचे बांधकाम केलेले असेल आणि विद्युत पंपाद्वारे शेतपिकांचे सिंचन केले जात असेल तर तशी जमीन खरेदी करताना बाजार भावापेक्षा १० ते २० पट मोबदला दिला गेला पाहिजे, असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. या निर्णयाचा आदर करीत शेतकऱ्यांना मोबदला देणे गरजेचे असल्याचे मतही म. फुले समता परिषदेने नमूद केले.