शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा द्या

By admin | Updated: December 24, 2014 23:05 IST

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र तुलनेने कमी सुविधा दिल्या जातात. जर कामाची समप्रमाणात विभागणी होत असेल तर वेतनासह अन्य सुविधा देण्यात

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या वर्धा : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मात्र तुलनेने कमी सुविधा दिल्या जातात. जर कामाची समप्रमाणात विभागणी होत असेल तर वेतनासह अन्य सुविधा देण्यात शासनाकडून दुजाभाव का होत आहे, असा प्रश्न कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. राज्य गट संसाधन केंद्र अंतर्गत अनेक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर बी.आर.सी. कक्षाची स्थापना केली आहे. यात कार्यरत कर्मचाऱ्यांना साडे सहा हजार रूपये मानधन दिले जाते. वाढती महागाई पाहता मानधनात वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र शासनाकडून याची दखल घेण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्रांना साकडे घातले आहे. यावेळी सादर केलेल्या निवेदनातून मागणी केली असून यात कायमस्वरूपी कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे. ग्रामसेवक व शिक्षणसेवक कर्मचाऱ्याां्रमाणे शासकीय सेवेत समायोजन करावे, अंशकालीन दर्जा देऊन वेतनश्रेणी निश्चित करावी, शासकीय भत्ते असे एकूण ३४ हजार ४०० रूपये करावे, महिलांना प्रसुती रजा देण्यात यावी, बी.आर.सी. कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे रजा देण्यात यावी. सर्व गट व समूह समन्वयक यांना विस्तार अधिकारी पाणी व स्वच्छता दर्जाचे स्वतंत्र पदाची निर्मिती करावी. सवे भत्ते व प्रवासी भत्ता लागू करावेत. डीडब्ल्युएसएम कक्षातील कर्मचाऱ्याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता बी.आर.सी कर्मचाऱ्यांना दिला जावा, कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा लागू कराव्या, शासकीय नियमाप्रमाणे भविष्य निर्वाह निधी लागू करावा, बी.आर.सी. समन्वयकांच्या अपघाती संरक्षण विम्यात वाढ करावी, सर्व केंद्रात कनिष्ठ व वरिष्ठ सहायकाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)