लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महिलांना विधानसभा व लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावित अशी मागणी महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन मंगळवारी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले.महिला या देशाचा कणा आहे. सर्वत्र महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. त्या अत्यंत कुशल पद्धतीने घर घरातील प्रत्येक सदस्यांचा सांभाळ करतात. मुलावर चांगले संस्कार त्या टाकतात. महिलांच्या हातात देशाचा कारभार दिल्यास त्या देशही चांगला सांभाळू शकतात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कार्य इतर महिलांना पे्ररणा देणारे असून त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने महिलांच्या हितार्थ पाऊले उचलण्याची मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना अर्चना मून, नलीनी गायकवाड, जया गायधने, राजश्री देशमुख, वहिदा शेख, भारती खोंड, सोमवंशी आदी उपस्थित होते.
दोन्ही सभागृहात महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:48 IST
महिलांना विधानसभा व लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावित अशी मागणी महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
दोन्ही सभागृहात महिलांना ३३ टक्के आरक्षण द्या
ठळक मुद्देमहिला काँग्रेसची मागणी : पंतप्रधानांना निवेदनातून साकडे