शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हेक्टरी २५ हजारांची मदत द्या

By admin | Updated: October 24, 2015 02:08 IST

सोयाबीन उत्पादन एकरी अर्धा ते एक पोते येत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.

राजू तिमांडे यांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून मागणी हिंगणघाट : सोयाबीन उत्पादन एकरी अर्धा ते एक पोते येत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. कपाशी किडीने पछाडल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. अशावेळी तातडीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना एकरी २५ हजार रुपयांप्रमाणे शासनाने मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवदेनातून केली आहे.सोयाबीनचे उतारे यंदा कमालीचे कमी असून या हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची रक्कमही उत्पादनातून निघाली नाही. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणीच केली नाही. कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पीकही घेणे शक्य नाही. त्यातच सोयाबीनच्या हमीभावात नाममात्र वाढ करून शासनाने शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. सर्वत्र परिस्थिती गंभीर आहे. या हंगामात सोयाबीन तसेच कापसाचे व्यवस्थापनच बिघडले असून कपाशीला बोंड नाहीत मर रोगाचा प्रादुर्भावाने कपाशीचे उभे पीक वाळत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या हातातून सोयाबीन गेले आहे. त्यांना लागणारा खर्चही निघणे कठीण झाल्याचे चित्र आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत शासनाने करावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवदेनातून केली आहे. सोबतच त्यांनी कपाशीला सहा हजार रुपये दर देण्याची मागणी केली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)