शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

दहावीतही मुलींचीच आघाडी

By admin | Updated: June 7, 2016 07:40 IST

बारावीच्या निकालानंतर सर्वांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती. सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला माध्यमिक

वर्धा : बारावीच्या निकालानंतर सर्वांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती. सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८२.३० टक्के लागला. हा निकाल नागपूर विभागात सर्वात कमी आहे. असे असले तरी जिल्ह्यात बारावीप्रमाणे मुलींनीच आघाडी घेतल्याचे टक्केवारीवरून दिसून येते. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.२६ तर मुलांची टक्केवारी ७८.४८ आहे. जिल्ह्यात जाहीर झालेल्या निकालात भरत ज्ञान मंदिरम्ची सुरूची प्रकाश विष्णू हीने ९८.४० टक्के गुण घेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तिने ५०० पैकी ४९२ गुण घेतले आहे. तर जिल्ह्यातून दुसरा येण्याचा मान अग्रगामी हायस्कूल येथील आदित्य डोकवाल याने पटकाविला आहे. त्याने ५०० पैकी ४९० गुण म्हणजेच ९८ टक्के घेतले आहे. तो जिल्ह्यात मुलांमधून पहिला ठरला. तर तिसऱ्या क्रमांकावर दोन मुली आहेत. त्यांनी प्रत्येकी ९७.६० टक्के गुण घेतले आहेत. यात हिंमतसिंगका विद्यालयाची प्राजक्ता गोपाल बावनकर व अग्रगामी हायस्कूल येथील नेत्रा विजय कडू या दोघांचा समावेश आहे. दोघींनीही प्रत्येकी ५०० पैकी ४८८ गुण घेतले आहेत.दहावीच्या परीक्षेकरिता जिल्ह्यातील २६९ शाळांमधून एकूण १९ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा निकाल दिला. त्यापैकी १९ हजार २३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १५ हजार ८३० विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. जिल्ह्यातील १८ शाळांनी १०० टक्के निकाल दिला. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल वर्धा तालुक्याने दिला असून त्याची टक्केवारी ८६.२४ इतकी आहे. तर सर्वात कमी निकाल आर्वी तालुक्याने दिला आहे. त्याची टक्केवारी ७५.७७ टक्के आहे. जिल्ह्यातून ९ हजार ८४५ मुले व ९ हजार ४६० मुलींनी परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यापैकी ९ हजार ८०० मुले व ९ हजार ४३५ मुलांनी परीक्षा दिली. यात ७ हजार ६९१ मुले तर ८ हजार १३९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. सुरूचीला व्हायचंय प्रशासकीय अधिकारी४जिल्ह्यातून प्रथम आलेल्या सुरूचीला प्रशासकीय सेवेत जायचे आहे. अभ्याससह सुरू चीने खेळातही प्राविण्य मिळविलेले आहे. ती बॉल बॅडमिंटनची राष्ट्रीय खेळाडू आहे. नियमित अभ्यास आणि शिकवणी वर्गातून मिळणारे मार्गदर्शन हा तिचा यशाचा मंत्रा असल्याचे सुरूची सांगते. सुरूचीचे वडील महालक्ष्मी स्टील प्लांटमध्ये अभियंता आहे तर आई सरोज या गृहिणी आहे. सुरूचीची मोठी बहीण प्रतिज्ञा फॅशन डिझाईनिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे. नर्सरीपासून सुरूचीने कधी पहिला नंबर गमावला नाही. असे तिचे पालक सांगतात. वेळोवेळी आई-वडिलांकडून प्रोत्साहन मिळत असल्याने आज हे यश मिळविता आल्याचे सुरूची म्हणते.क्रीडांच्या गुणांसह कुशल कांबळेला ९९ टक्के४न्यू इंग्लिश हायस्कूल येथील कॉन्व्हेंटचा कुशल कांबळे याने ९९ टक्के गुण घेतले आहे. त्याने परीक्षेत ४७५ गुण घेतले तर त्यात २० टक्के गुण खेळाचे मिळविल्यास त्याचे ९९ टक्के होत आहे. या गुणानुसार तो जिल्ह्यातून पहिला ठरत आहे. ४कुशल हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील झाडा येथील आहे. तो शिक्षणाकरिता वर्धेतील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल झाला. त्याने राष्ट्रीय स्तरावर खेळात सहभाग नोंदविल्याने त्याला अतिरिक्त २० गुण मिळाले आहेत.१८ शाळांचा निकाल १०० टक्के ४दहावीच्या निकालात वर्धा जिल्हा नागपूर विभागात सर्वात कमी निकाल देणार जिल्हा म्हणून नोंद झाली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १८ शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे. ३,२०२ विद्यार्थ्यांना प्राविण्य४दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात १५ हजार ८३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ३ हजार २०२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत आले आहेत. ४या व्यतिरिक्त पहिल्या श्रेणीत ६ हजार २३० आणि द्वितीय श्रेणीत ५ हजार ४०४ मुले आहेत. निव्वळ पास श्रेणीत ९९४ मुले आहेत.