शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

मुलीने परस्पर विकली वडिलांची शेती

By admin | Updated: April 11, 2016 02:20 IST

वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन मुलीने परस्परच विकली. यासाठी वडिलांच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला उभे केले तर दलालाची मध्यस्थी स्वीकारण्यात आली.

पाच जणांवर गुन्हे दाखल : खरेदीदार नागपूरचा रहिवासीदेवळी : वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन मुलीने परस्परच विकली. यासाठी वडिलांच्या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला उभे केले तर दलालाची मध्यस्थी स्वीकारण्यात आली. हा प्रकार उघड होताच तक्रारीवरून पाच जणांवर शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती अशी की, महादेव डोमाजी कामडी यांच्या नावे मौजा चिकणी येथे शेत सर्व्हे क्र. २३४/२ आराजी ०.८१ हेक्टर जमीन आहे. सदर जमीन मुलगी शोभा रामेश्वर साटोणे रा. पवनार हिने परस्पर विकली. विक्री प्रसंगी वडिलांऐवजी दुसऱ्या व्यक्तीला उभे केले. दलालाच्या मदतीने सदर शेताची विक्री करण्यात आले. ही बाबत पोलीस तपासात उघड होताच गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी दिली.महादेव कामडी यांचा मृत्यू झाल्यानंतर नरेश महादेव कामडी शेत नावे करण्यासाठी पटवाऱ्याकडे गेले. यावेळी शेत सिद्धार्थ जगदीश तितुरकर (४५) रा. रमाईनगर नागपूर यांना विकल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे नरेश कामडी यांना धक्काच बसला. त्यांनी विक्रीपत्राची प्रत सहायक निबंधक कार्यालयातून प्राप्त केली. सदर विक्रीपत्रावर महादेव कामडीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो दिसला. वडील स्वाक्षरी करीत होते; पण विक्री पत्रावर अंगठा लावला होता. यावरून ही विक्री बनावट असल्याचे आढळून आले. यामुळे नरेश यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात पवनार येथे राहणारी मुलगी शोभा रामेश्वर साटोणे हिने पाच व्यक्तींच्या मदतीने वडिलांचे शेत विकल्याचे उघड झाले. यात नागपूर येथील शेत घेणारा सिद्धार्थ जगदीश तितुरकर, दलाल विनोद ईश्वर फुलकर रा. हिंगणघाट, सिमा वसंत कांबळे रा. मोहननगर वर्धा, मुलगी शोभा रामेश्वर साटोणे रा. पवनार, गजानन राघोराव शिंदे रा. हिंगणघाट व मन्साराम उईके रा. सावंद (जि.वर्धा) यांचा समावेश आहे. या सर्वांवर भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींनी मिळून महादेव कामडी यांचे शेत १८ आॅक्टोबर २०१४ मध्ये सिद्धार्थ तितुरकर याला विकले; पण शेताचा कब्जा दिला नव्हता. यामुळे शेताची विक्री झाली नसल्याचे कुणालाही माहिती नव्हते. कायदेशीर कार्यवाही करण्यास अडचण जाऊ नये म्हणून तितुरकर यांनी शेतावर कब्जा घेण्यास विलंब केला. याबाबत नरेश कामडी यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तपासात हा प्रकार उघडकीस आला. यातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदणे यांनी दिली.(प्रतिनिधी)