शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आपल्या दुर्दैवावर अश्रू ढाळतोय ‘गिरीधर टॉवर’

By admin | Updated: January 6, 2015 23:05 IST

बजाज चौक नाव उच्चारताच त्याचे भव्य स्वरुप, वाहनांची रेलचेल, लोकांची धडपड सारेकाही एका क्षणात डोळ्यासमोर उभे राहते. जमनालाल बजाज यांचा भव्य पुतळा या चौकाच्या सौंदर्यात भर घालतो़

वर्धा : बजाज चौक नाव उच्चारताच त्याचे भव्य स्वरुप, वाहनांची रेलचेल, लोकांची धडपड सारेकाही एका क्षणात डोळ्यासमोर उभे राहते. जमनालाल बजाज यांचा भव्य पुतळा या चौकाच्या सौंदर्यात भर घालतो़ आणखी एक गोष्ट या चौकाचे महात्म्य वाढविणारी आहे, ती म्हणजे एका कोपऱ्यात दीपस्तंभासम उभा असलेला ‘गिरीधर टॉवर’! पण, तो दुर्लक्षित आहे. एखाद्या कोपऱ्यात बसून आपल्या दुर्दैवावर हा टॉवर अश्रू ढाळत बसावा, अशी त्याची दैना झाली आहे.७ फेब्रुवारी १९८२ रोजी तत्कालिन जिल्हाधिकारी मधुकर चौबे यांच्या हस्ते या टॉवरचे लोकार्पण झाले. लक्ष्मीनारायण गांधी यांनी काकाच्या स्मरणार्थ या टॉवरची निर्मिती केली, असा उल्लेख या टॉवरवर नमूद आहे. या चौकात हाकेच्या अंतरावर बसस्थानक आणि रेल्वे स्थानक आहे. या चौकात सतत नागरिकांची वर्दळ असते. त्यांना वेळ बघता यावी, यासाठी टॉवरवर एक घड्याळ लावलेले होते. ते आता बंद पडले आहे. या चौकाच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम हा टॉवर करीत होता; पण कालांतराने त्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत गेले. आता तर त्याकडे कुणी ढुंकूनही बघायला तयार नाही, अशी गत त्या टॉवरची आहे. याची कुणालाही खंत नाही, हे विदारक सत्य त्या चौकातून ‘टॉवर’कडे बघितल्यास लक्षात आल्यावाचून राहत नाही.(जिल्हा प्रतिनिधी)