शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गिरड परिसराला गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:17 IST

सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना रविवारी गिरडसह परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देकापसाचे पीक जमीनदोस्त : वादळी वाºयासह पावसाचा मारा

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना रविवारी गिरडसह परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या गाररपिटीमुळे कपाशीचे पीक जमिनदोस्त झाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे.गत १५ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे होत्या. शेतातील उभे पीक कसे वाचवावे हिच चिंता शेतकºयांना भेडसावत असताना गिरड परिसरात रविवारी दुपारी वादळीवाºयासह पाऊस व गारपिटाने हजेरी लावली.रविवारी गिरड, मोहगांव, आर्वी, तावी, शिवणफळ येदलाब येथे मुसळधार पाऊस झाला. या गावांमध्ये शेतातून पाणी निघाल्याने नाले तुंडुब भरून गेले. मात्र या गावां व्यतिरिक्त तालुक्यात कुठेही पाऊस पडला नसल्याचे सांगण्यात येते. वादळीवाºयासह झालेल्या पावसामुळे व गारपिटामुळे शेतकºयांचे बºयापैकी नुकसान झाले आहे. रविवारच्या पाऊस व गारपिटामुळे कपाशी, सोयाबीन व तूर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पोलीस ठाण्यातील झाड उन्मळून पडलेया वादळी वाºयामुळे अने झाडे उन्मळून पडली. यात गिरड येथील पोलीस ठाण्यातील ५० वर्षांपूर्वीचे जुने गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. यासह परिसरात १० ते १५ जागची मोठमोठाली झाडे वादळामुळे पडल्याचे सांगण्यात येते. झालेल्या वादळीवाºयासह गारपिटामुळे कुठलीही जीवीत हाणी झाली नसली तरी शेतकºयांची चिंता वाढविली आहे. या पावसाने गिरड, चोरविवारा, भनगापुर, नान्ही, बोथली शिवणफळ, आर्वी या शिवारातील शेतकºयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येते.ुदमदार पावसामुळे चिकणी (जा.) परिसरातील पिकांना संजीवनीचिकणी (जामणी)- दिवसभर अंगाला चटके देणारे ऊन होते. परंतु, सूर्यणारायण मावळतीला जात असताना अचानक वातावरणात बदल झाला. काळ्या ढगांनी आकाशात एकच गर्दी करून परिसरात दमदार पावसाने हजेरी दिली. या भागातील शेतकºयांसह नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे परिसरातील कपाशी, तूर, सोयाबीन व विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांना संजीवनी मिळाली आहे.विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळलासेवाग्राम- दिवसभर वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त असताना सायंकाळी आकाशात एकच गर्दी करून विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात परिसरात पावसाच्या सरी झाल्या. पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. विविध पीकही पाण्याअभावी माना टाकत होती. पाऊस न झाल्यास जनावरांच्या चाºयासह पाण्याचा प्रश्न भेडसावेल असे बोलले जात असताना परिसरात पाऊस झाला. अजूनही या भागातील विहिरी व जलायशांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नसल्याचे वास्तव आहे. या भागातील शेतकºयांसह नागरिकांना काळ्या ढगातून जोरदार पाऊस होईल, अशी आशा आहे. इतके असले तरी सोमवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.