शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हातगाडीच्या माध्यमातून केली रोजगारावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:05 IST

रोजगारासाठी नागरिक सतत भटकंती व स्थलांतर करीत असतात. शिक्षण घेतलेले ‘व्हाईट कॉलर’ ‘जॉब’च्या प्रतीक्षेत वय व वेळ वाया घालवितात.

ठळक मुद्देबी.ए. शिकलेल्या तरूणाचे धाडस : स्वत:च्या शेतात लावला ऊस व स्वीटकॉर्न

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : रोजगारासाठी नागरिक सतत भटकंती व स्थलांतर करीत असतात. शिक्षण घेतलेले ‘व्हाईट कॉलर’ ‘जॉब’च्या प्रतीक्षेत वय व वेळ वाया घालवितात. काही शासनाच्या योजनांचा लाभ घेत चौक राखतात; पण येथील युवकाने नोकरीच्या मागे न लागता ऊसाच्या रसाची बंडी, कणीस विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अन्य तालुक्यातही हा व्यवसाय सुरू करण्याचा मानस त्याने व्यक्त केला.सध्या सेवाग्राम येथे ऊसाच्या रसाची बंडी सुरू करण्याचे धाडस करीत सदर युवकाने स्वयंरोजगार सुरू केला. सोबतच अन्य तालुक्यांत इतरांना रोजगार देण्याचा मानसही गौरव तिडके यानी व्यक्त केला आहे. गौरवचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाले. वडील पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहे. शिक्षण झाले; पण नोकरीची संधी दिसत नव्हती. जिल्ह्यात हातगाडीवरून व्यवसाय करणाºया परप्रांतीयांना पाहून गौरवच्या मनात कल्पना आली. त्याने मेडिकल चौकात रसवंती सुरू केली. ती उन्हाळ्यातच चालते, असे नाही तर हिवाळ्यातही रसाला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. नेमकी हिच बाब हेरून त्याने दोन हातगाड्या तयार केल्या. एका गाडीवर स्वत: तर एका युवकाला तयार करून रोजगार सुरू केला.पावसाळ्यात नागरिक आवडीने भाजलेले कणीस व भेळ खातात. कणीसचा सिजन पावसाळ्यात असल्याने रोजगाराची संधी आहे. स्वत:च्या शेतात स्वीटकॉर्न व ऊसाचे उत्पादन घेतल्यास फायदा अधिक होता. या सर्वांचा हिशेब करून या व्यवसायाकडे तो वळला. यातून रोजगाराचा प्रश्न सुटला. सोबतच तो अन्य युवकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे, हे विशेष! एका युवकाने रोजगाराच्या वाटा स्वत:च शोधून काढल्या. शेतावर पूर्णत: निर्भर न राहता पूरक व्यवसायातून विकासाची वाटू शोधून काढली.अन्य युवकांनाही रोजगार देण्याचा मानसप्रारंभी सेवाग्राम येथील मेडिकल चौकात रसवंती लावून स्वयंरोजगार सुरू करणाºया गौरवने आता दुसरी गाडीही तयार केली आहे. या गाडीवर अन्य एका युवकाला रोजगार दिला आहे. दोन गाड्यांवर ऊसाचा रस आणि कणिस विकण्याचा रोजगार त्याने शोधला आहे. आता त्याला अन्य तालुक्यांतही हाच व्यवसाय सुरू करावयाचा आहे. यासाठी तो अन्य बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या मानसिकतेत आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू आहेत.