शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्या कुटुंबीयांना मदत मिळावी

By admin | Updated: November 28, 2015 03:04 IST

वाघ व तत्सम प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना शासनाच्यावतीने मदत मिळते.

वर्धा : वाघ व तत्सम प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना शासनाच्यावतीने मदत मिळते. त्याच प्रमाणे सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांच्या अप्तांना शासनाची मदत मिळावी, अशी मागणी विदर्भ सर्प मित्र मंडळाचे संस्थापक सर्प अभ्यासक गजेंद्र सुरकार यांच्यासह सदस्यांनी खा. रामदास तडस यांना निवेदनातून केली. शिवाय या विषयावर चर्चाही करण्यात आली. संपूर्ण भारतात विविध राज्यात एक वन्य जीव असलेल्या व इतर वन्यजीवाप्रमाणे वन्यजीव संरक्षण सूचित अनुसूची १ व अनुसूची २ मध्ये असलेल्या विषारी साप या वन्य जीवाच्या दंशाने अनेकांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक शेतकरी, शेतमजूर, रस्त्याच्या, बांध वस्तीच्या, जंगलतोड करणारे मजूर वन विभागात रोजंदारी करणाऱ्या मजुरांचा समावेश आहे. मात्र त्यांच्या वारसांना किंवा कुटुंबांना वनखाते विभागाकडून, सरकारकडून, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री सहायता कोषमधून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. वन्यजीव संरक्षण सूचित अनुसूची एक व अनुसूची २ मध्ये असलेल्या अस्वल, वाघ, सिंह, बिबट, हत्ती व तत्सम प्राण्याच्या हल्ल्यात जायबंदी वा मृत्यू झाल्यास ताबडतोब आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रात तर आठ लाख रुपये दिले जाते. परंतु विषारी सर्पदंशाने मृत्यू झाल्यास आर्थिक मदत दिली जात नाही. माणूस जंगलात शिरतो किंवा जंगलाशेजारी राहतो. त्या परिस्थितीत वन्यप्राणी हल्ला करतात. विषारी साप शेतात कामाच्या जागी, घरात दंश करतात. साप व इतर प्राणी एकाच अनुसूचीमध्ये असूनसुध्दा हा भेदभाव केला जातो. त्याबद्दल केंद्र शासनाने पुढाकार घेऊन निर्णय घ्यावा तसेच राज्य सरकारला निर्देश द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.लोकसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरात हा प्रश्न लावून धरून वनमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन खा. तडस यांनी दिले. यावेळी मंगेश शेंडे, मयूर राऊत, नरेंद्र कांबळे, सुनील ढाले, प्रकाश कांबळे उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दादाराव केचे उपस्थित होते.(प्रतिनिधी)