लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतींवर केंद्र व राज्य सरकारने तात्काळ नियंत्रण मिळवून सदर दोन्ही अतिज्वलनशील पदार्थ स्वस्त करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी बुधवारी सदर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. या आंदोलनाचे नेतृत्त्व नगरसेवक यशवंत झाडे व सिताराम लोहकरे यांनी केले.पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस गगणाला भीडत आहेत. पेट्रोल व डिझेलच्या होणाºया दरवाढीमुळे इतर वस्तूंवर त्याचा परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी असताना केंद्र व राज्य सरकार विविध कर पेट्रोल व डिझेलवर लादत आहेत. त्यामुळे पेट्रोलच्या व डिझेलच्या दरात बºयापैकी वाढ झाल्याचे दिसून येते. पेट्रोल व डिझेलच्या दिवसेंदिवस होणाºया दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. पेट्रोल व डिझेलचे दर तात्काळ कमी करून त्यावरील विविध कर कमी करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन पेट्रोल व डिझेल वर तात्काळ जी.एस.टी. लावण्यात यावा. गॅस सिलिंडरच्या दर कमी करण्यात यावे. समाजातील ज्या आर्थिक दुर्बल घटकांच्या घरात विद्युत पुरवठा नाही त्यांना शासनाच्यावतीने नि:शुल्क विद्युत पुरवठा द्यावा. गरजुंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, या मागण्याही रेटून लावल्या होत्या. आंदोलनात चंद्रभान नाखले, प्रितम हिराणी, सुनील घिमे, पांडुरंग राऊत, नरेंद्र कांबळे, अशोक नागतोडे, राहुल खंडाळकर, वासुदेव पाल, दिनेश धुर्वे, गजु ढोरे, दुर्गा काकडे, चुडामन घवघवे, संजय भगत, रविंद्र हटकर, प्रफुल लोणकर, रामराव वाघमारे, सुरेश तडस, संतोष पाटील, महेश दुबे यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मा.)चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शासनाच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध केला. शिवाय वेळीच योग्य पाऊल उचलण्याची मागणीही केली.
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:20 IST
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतींवर केंद्र व राज्य सरकारने तात्काळ नियंत्रण मिळवून सदर दोन्ही अतिज्वलनशील पदार्थ स्वस्त करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी बुधवारी सदर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. या आंदोलनाचे नेतृत्त्व नगरसेवक यशवंत झाडे व सिताराम लोहकरे यांनी ...
पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवा
ठळक मुद्देभाकपाची मागणी : जिल्हाकचेरीसमोर दिले धरणे