शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

‘त्या’ समाज कंटकाला अटक करा

By admin | Updated: May 27, 2016 01:59 IST

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर तसेच म. फुले वॉर्डातील बुद्ध विहारावर पेंट फेकून विटबंना ...

ठाणेदाराला मागणी : परिसरात तणावाचे वातावरणहिंगणघाट : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर तसेच म. फुले वॉर्डातील बुद्ध विहारावर पेंट फेकून विटबंना केल्याच्या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे. शहरातील व्यवसायिकांनी या घटनेच्या निषेधार्थ आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. ही घटना गुरूवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. डॉ. आंबेडकर चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्यावर अज्ञात इसमाने पेंट फेकून विद्रुप केल्याची घटना नागरिकांच्या लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित डॉ. पी.जी. खोब्रागडे, अ‍ॅड. ऋषी सुटे, बबिता वाघमारे, रसपाल शेंदरे, टी.एफ. शेंडे, प्रलय तेलंग, बुद्धम कांबळे, प्रभाकर कांबळे, लता थूल, सुनील डोंगरे, सुरेखा मेश्राम, विजय तामगाडगे, शंकर मुंजेवार, अनिल मुन, सुमेध पाटील, विक्की वाघमारे, सुरेश मुंजेवार, भीमराव वाघमारे, राजकुमार मेश्राम, मयुर सुखदेवे, मनोज रूपारेल, बाळा मानकर, राजू फुलझेले, चक्षुपाल शिंपी, भीमराव वाघमारे, संजय वानखेडे आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील या पुतळ्या जवळ सि.सी. टिव्ही कॅमेरे व २४ तास दोन चौकीदार कायम स्वरूपी नेमण्याची व आरोपीला तात्काळ शोध घेण्याची मागणी एका निवेदनाद्वारे ठाणेदारांना केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पेंट मिसळण्यासाठी वापरलेली काडी तसेच पेंटचे डब्बे जप्त केले असून याठिकाणी ठसे तज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण केले होते. तत्पूर्वी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, ठाणेदार निलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर, तहसीलदार दीपक कारंडे, न.पा. मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. या घटनेची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल मुन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध भादंविच्या कलम २९५ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)