शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य कार्यकर्ता हीच पक्षाची खरी ताकद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST

खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने आपल्याकडे बघते आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांचे मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडविता आले पाहिजे. सत्ता आली म्हणून आनंदोत्सव साजरा करताना जबाबदारी वाढली याचे भानही ठेवले पाहिजे. लोकांच्या विश्वासाला आपल्याला पात्र ठरायचे आहे. म्हणून सर्वांनी पक्ष संघटन आणि जनतेच्या समस्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे : राकाँच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्व संपून जात अस जेव्हा म्हटले जाते तेव्हाच पक्षाला उभारी मिळत असते. सामान्य कार्यकर्ता ही पक्षाची ताकद आहे. खा. शरद पवार यांनी ही ताकद ओळखून सर्वसामान्य कार्यकत्यांचे हित जोपासले आहे. मोठ्या जडणघडणीतून पक्ष उभा झाला आहे. कधी नव्हे एवढी ताकद तरूणांनी शरद पवार यांच्या मागे उभी केली. या विश्वासाचे सार्थक आपल्याला करायचे आहे. सामान्य कार्यकर्ता ही पक्षाची ताकद असून पक्ष संघटन बांधणीसह त्याच्या मजबुतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन राकाँच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केले.स्थानिक बजाज चौक भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला खा. सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन राकाँच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माजी आमदार सुरेश देशमुख, राजू तिमांडे, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, लक्ष्मीकांत सोनवने, महिला अध्यक्षा शरयु वांदीले, धनराज तेलंग, क्रांती धोटे, सलील देशमुख, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांची उपस्थिती होती.खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने आपल्याकडे बघते आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांचे मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडविता आले पाहिजे. सत्ता आली म्हणून आनंदोत्सव साजरा करताना जबाबदारी वाढली याचे भानही ठेवले पाहिजे. लोकांच्या विश्वासाला आपल्याला पात्र ठरायचे आहे. म्हणून सर्वांनी पक्ष संघटन आणि जनतेच्या समस्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सुनील राऊत म्हणाले की, येत्या तीन महिन्यात नागपूर व अमरावती विभाग यांच्या दोन दिवसीय कार्यकर्त्याचे शिबिर आयोजित करून विदर्भात पक्षात चैतन्य निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याला खा. सुप्रिया सुळे यांनीही दुजोरा देत येत्या अधिवेशनात खा. शरद पवार यांच्याकडे सदर शिबिराचा प्रस्ताव ठेवून त्यावर सकारात्मक चर्चा करण्याचे सांगितले. या कार्यक्रमादरम्यान खा. सुप्रिया सुळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अनंत झाडे, गोपाळ मरसकोल्हे, सुनील भोगे, मिलिंद हिवलेकर, माधवी साबळे, वीणा दाते, शारदा केने, अर्चना मोरे, देशमुख, कुºहाडकर, टी. सी. राऊत, संजय काकडे, संदीप भांडवलकर, अंबादास वानखेडे, सुनील हेटे, कवडु बुरंगे, लईक फारूकी, मुन्ना झाडे, प्रशांत कुत्तरमारे, सोनल ठाकरे, सुरज देवळीकर यांच्यासह राकाँचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे