शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरचा स्फोट; घराची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 22:09 IST

अचानक लागलेल्या आगीने घरातील साहित्याला आपल्या कवेत घेतले. दरम्यान घरातील गॅस सिलिंडर फुटले. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी घरातील संपूर्ण साहित्य व घर जळून कोळसा झाले. यात कलावती हेमराज रेवतकर यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले असून या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदीड लाखांचे नुकसान : वॉर्ड क्र.२ मधील घटना, महिलेच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कआंजी (मोठी) : अचानक लागलेल्या आगीने घरातील साहित्याला आपल्या कवेत घेतले. दरम्यान घरातील गॅस सिलिंडर फुटले. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी घरातील संपूर्ण साहित्य व घर जळून कोळसा झाले. यात कलावती हेमराज रेवतकर यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले असून या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक वॉर्ड २ मधील रहिवासी कलावती रेवतकर यांच्या घरातून जोरदार आवाज झाल्याने व घरातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काहींनी आरडा-ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. आग लागल्याने निदर्शना येताच रेवतकर यांच्या शेजारी असलेल्या नागरिकांनी घराच्या आवारात असलेल्या विहिरीवरील पाण्याची मोटर सुरू करून आगीवर पाण्याचा मारा केला.सुमारे दोन तासाच्या प्रयत्नाअंती ग्रामस्थांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. आग लागल्याची माहिती मिळताच खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर, मनिष मसराम, राजेश शेंडे, गजानन गायकी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.कलावती शिजविते विद्यार्थ्यांसाठी खिचडीकलावती रेवतकर (५२) या विधवा असून त्या शाळकरी मुला-मुलींसाठी खिचडी शिजविण्याचे काम करतात. या आगीत त्यांच्या घरातील संसारउपयोगी साहित्यासह टि.व्ही., कुलर, फॅन, कपडे, धान्यसाठा व घराचा लाकुडफाटा जळून कोळसा झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.