शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

गॅस सिलिंडरचा स्फोट

By admin | Updated: April 10, 2016 02:21 IST

गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री स्वयंपाकाकरिता गॅस पोटविताना गॅसच्या गळतीमुळे सिलिंडरने पेट घेतला.

बरबडी येथील घटना : आगीत घर खाकसमुद्रपूर : गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री स्वयंपाकाकरिता गॅस पोटविताना गॅसच्या गळतीमुळे सिलिंडरने पेट घेतला. आगीच्या भीतीमुळे घरातील लोकांनी बाहेर पळ काढताच सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला. आगीत सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही घटना तालुक्यातील बरबडी येथे शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, रामभाऊ बरडे (५५) यांची पत्नी स्वयंपाक कारण्याकरिता स्वयंपाकघरात गेली होती. यावेळी सिलिंडरला रेग्युलेटरपासून झालेल्या गॅस गळतीमुळे आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. आग दिसताच बरडे यांची पत्नी, त्यांची आई व मुले घराबाहेर पडले. ते घराबाहेर निघताच सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले. या आगीत घरातील १० क्विंटल तूर, ३ पोते गहू, तांदूळ, दाळ, टीव्ही, फ्रीज, कुलर आदी साहित्याचा कोळसा झाला. तर कपाटात ठेवलेले सोने-चांदीचे १ लाख २० हजाराचे दागिने व रोख ४० हजार रुपये रोख आगीच्या भक्षस्थानी आले. यात पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. बरडे यांना भूदानचे तीन एकर शेत मिळाले होते. त्याला मदत म्हणून त्यांनी काही शेत भाडेतत्त्वावर घेतले. यातून निघणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. या आगीत घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला. आगीची माहिती मिळताच भारत तिजारे, अनिल घोडे, विठ्ठल साबळे, मोहन चिडे, गोपाल वंगल, अरविंद घोडे, अमर बोरकर, राजू तिजारे, राजू बोरकर यांच्यासह गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. पण आग आटोक्यात येण्याऐवजी ती वाढतच गेली. संपूर्ण घर कवेत घेतल्यानंतरच आग आटोक्यात आली. घटनेची माहिती मिळताच तलाठी गजानन गराड यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला.(तालुका प्रतिनिधी)