शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

कचरा कृती साक्षरता अभियानात निवृत्तांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:49 IST

कचरा व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा ठरत आहे. ही गरज लक्षात घेत आधारवड या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेने कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक समितीही गठित केली आहे.

ठळक मुद्देआधारवड संघटनेचा पुढाकार : कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियान राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कचरा व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा ठरत आहे. ही गरज लक्षात घेत आधारवड या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेने कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक समितीही गठित केली आहे. पिपरी (मेघे) येथील आचार्य श्रीमन्नारायण तंत्रनिकेतनने कचरा कृती साक्षरता अभियान सुरू केले आहे. आधारवडने पुढाकार घेत या उपक्रमातही सहभाग घेतला आहे.कचºयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली, खानपानाच्या बदलत्या सवयी, प्लास्टिकचा वाढता वापर, लोकांची उदासीन वृत्ती आदी कारणांमुळे कचºयाचे प्रमाण वाढत आहे. दुर्गंधी व हानिकारक वायंूमुळे सामान्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. ओला कचरा कुजल्यानंतर निर्माण होणारा मिथेन हा ज्वलनशील वायू कार्बन वायुपेक्षाही घातक आहे. सुका कचरा जाळल्याने होणारा धूर वायू प्रदूषणाचे कारण ठरला आहे. वास्तविक, कचºयाची विल्हेवाट लावणे नगर परिषदेचे कर्तव्य आहे; पण कचरा गोळा केल्यानंतर तो साठवून ठेवण्यासाठी पालिकेला जागा अपुरी पडत आहे. शिवाय ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचा प्रश्न आहे. यामुळे कचºयाची व त्याच्याशी निगडीत स्वच्छतेची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. यामुळे तंत्रनिकेतन तथा आधारवडने कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियानच हाती घेतले.या उपक्रमाची रूपरेषा व कृती योजना तयार करण्यासाठी कचरा व्यवस्थापन समितीची सभा सेवानिवृत्त अभियंता किशोर देवतारे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. सभेला आचार्य श्रीमन्नारायण पॉलिटेक्निक पिपरीच्य घनकचरा व्यवस्थापन अभ्यास प्रकल्पाचे अभियंता प्रा. आशिष चव्हाण, शंभरकर, नयना पाटील मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी ओला व सुका कचरा वेगळा कसा करावा, ओल्या कचºयापासून कंपोस्ट खत कसे तयार करावे, त्यासाठी डस्टबीनचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली. सभेला आधारवडचे संस्थापक श्यामकांत देशपांडे, सचिव चंद्रशेखर दंडारे, सदस्य अ‍ॅड. मोहन देशपांडे, अ‍ॅड. नारायण भोयर, गिरीष उपाध्याय, किशोर देवतारे, अरुण महाबुधे, शेखर सोळंके, जनार्दन जगदाळे, चित्रा देशमुख, ज्योती देवतारे, सुनील हनमंते, कट्टाचे विकास गुज्जेवार, देवेंद्र कहाते आदी उपस्थित होते.कचरा व्यवस्थापन समितीचे मुख्य संघटक म्हणून श्यामकांत देशपांडे, संयोजक चित्रा देशमुख, ज्योती देवतारे यांची निवड करण्यात आली. कचरा व्यवस्थापनासाठी उपयोगी विशिष्ट डस्टबीन तयार केले. या कार्यात सर्व संघटना व नागरिकांनी सहकार्य करावे, शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे, सार्वजनिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन प्रा. शेख हाशम यांनी केले आहे.