शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट, पडक्या वास्तूंमधून निघतो गांजाचा धूर

By admin | Updated: April 5, 2015 02:04 IST

शहरात अवैध व्यवसायांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ राजरोसपणे दारू विकली जाते.

वर्धा : शहरात अवैध व्यवसायांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ राजरोसपणे दारू विकली जाते. सोबतच परजिल्ह्यांतून शहरात गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते़ यामुळेच शहरातील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींमधून रात्रीच्या सुमारास गांजाचा धूर निघत असल्याचे दिसून येते़ थातूरमातूर कारवाई केली जात असल्याने शौकिनांचे चांगलेच फावत असल्याचे दिसते़जिल्ह्यात शहरापासून तर गावखेड्यापर्यंत खुलेआम दारूविक्री सुरू आहे. दारूसोबतच आता गांजाविक्रीचे प्रमाण वाढल्याने युवक व्यसनाच्या आहारी जात आहे. छुप्या मार्गाने गांजाची विक्री केली जाते़ गांजाचे व्यसन जडलेली व्यक्ती दररोज गांजा ओढल्याशिवाय राहू शकत नाही़ यामुळे गांजा मिळविण्यासाठी गैरमार्गाचा अवलंबही होतो. महाविद्यालयीन तरूणही या व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र पाहावयास मिळते. सायंकाळ होताच निर्जनस्थळी अनेक जण गोळा होऊन मनसोक्त गांजा ओढतात. शहरातील अनेक शासकीय इमारतींचे बांधकाम अर्धवट झालेले आहे. या इमारतींमध्ये सध्या अवैध व्यवसायांना उधाण आल्याचे दिसून येते़ ठाकरे मार्केटमध्ये असलेल्या नाट्यसभागृहात सायंकाळच्या सुमारास मद्यपिंचा धुमाकूळ असतो. सोबतच शहरातील इतवारा चौक, पुलफैल, तारफैल, स्टेशनफैल, बोरगाव (मेघे), देवळी बायपास व शहरातील खिंडार इमारतींमधूनही गांजाचा धूर निघताना दिसतो.(शहर प्रतिनिधी)