शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018; अष्टविनायकांपैकी एक; केळझरचा सिद्धीविनायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:13 IST

विदर्भाच्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धीविनायक जागृत गणपतीचे येथे मंदिर आहे. केळझर हे गाव नागपूर वर्धा मार्गावर टेकडीच्या कुशीत वसले आहे. वशिष्ट पुराण, महाभारत व भोसलेकालीन इतिहासात या विनायकाचा उल्लेख आहे.

ठळक मुद्देउत्खननात मिळाले प्राचीन अवशेष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भाच्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धीविनायक जागृत गणपतीचे येथे मंदिर आहे. केळझर हे गाव नागपूर वर्धा मार्गावर टेकडीच्या कुशीत वसले आहे. वशिष्ट पुराण, महाभारत व भोसलेकालीन इतिहासात या विनायकाचा उल्लेख आहे.वशिष्ठ पुराणाप्रमाणे या गावाचे तत्कालीन नाव एकचक्रनगर होते. श्रीरामचंद्र प्रभुचे गुरू वशिष्ठ ऋषी यांचे वास्तव्य येथे होते. वशिष्ठ ऋषींनी भक्ती व नियमित पुजेकरिता स्वत:च्या या गणपतीची स्थापना केली. याचकाळात वर्धा नदीची निर्मिती केल्याचाही उल्लेख आहे. पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव वरदविनायक होते. तसेच वर्धा नदीचे वरदा असे नाव आहे. हा काळ रामजन्माच्या पूर्वीचा आहे.कालांतराने सिद्धीविनायक असे नाव प्रसिद्ध झाले. महाभारताप्रमाणे या गावात पांडव वास्तव्याला असताना बकासूर नामक राक्षसाचा वध झाल्याची नोंद आहे. ते ठिकाण वर्धा नागपूर मुख्य मार्गापासून गावाच्या आग्नेय बाजूला बौद्ध विहाराच्या समोर आहे. तो परिसर आजही बकासूर, तोंड्या राक्षसाचे मैदान म्हणून प्रचलित आहे. गणपती मंदिर म्हणजे निसर्गरम्य टेकडी वाकाटक नंतरच्या काळापासून एक भव्य किल्ल्याचे ५ बुरूज व ३ माती गोट्यांनी बांधलेले परकोट होते. पहिल्या व दुसऱ्या परकोटाच्या आत चौकोनी विहिर असून ती गणेश कुंड म्हणून ओळखली जाते. वाकाटकनंतर हे गाव प्रवरसेन राजाचे मुख्यालय राहिले. भोसले राजे कोल्हापुराहून नागपूर येथे स्थलांतरीत होण्यापूर्वी केळझर येथे मुक्कामाला होते. अशी इतिहासात नोंद आहे. केळझरस्थित वरदविनायक श्री गणपतीची मूर्ती १४० मीटर (४ फुट ६ इंच) उंच असून व्यास ४.४० मीटर (१४ फुट) आहे. अत्यंत प्रसन्नचित्त, मनमोहक, सजीव (जागृत) मूर्ती असून नवसाला पावणारा गणपती म्हणून परिसरात लौकीक आहे. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये एक म्हणून विशेष मान आहे.उत्खननात मिळाले प्राचीन अवशेषनागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरात प्राचीन भारताचे पुरावे मिळतात काय म्हणून दोन महिने उत्खननाचे कार्य केले. १८ विद्यार्थ्यांची चमू तसेच विभागप्रमुख डॉ. प्रिती त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनात काम करीत असताना त्या ठिकाणी मंदिराच्या पुर्वेकडील भागात उत्खनन करीत असताना तेथे प्राचिन किल्ल्याच्या दगडी भिंती, बुरूज, पाणी काढण्याकरिता बनविण्यात आलेली चिरेदार नाली आढळली. सोबतच मडके, काचेची खेळणी, बांगड्या तसेच अश्वाचा सांगाडा अशी अनेक साहित्य मिळून आले. यावरून या ठिकाणी प्राचिन भारताचा इतिहास दडल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे केळझरचे हे सिद्धीविनायक मंदिर ऐतिहासिक असल्याचे सिद्ध होते.या मंदिर परिसरात साईबाबा, पंढरीचे विठ्ठल-रुख्माई, लक्ष्मीमाता मंदिर, श्री.गजानन महाराज मंदिर, हनुमान मंदिर व टेकडीवरील शिव मंदिर असल्याने सिद्धीविनायकाच्या दर्शनाकरिता येणाºया भाविकांना या सर्व देवतांचे दर्शन घडते.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८