शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018; आर्वी शहरात २७५ वर्षांपूर्वी निघाली जमिनीतून गणपतीची मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 11:23 IST

शहरातील गणपती वॉर्ड येथील स्व. शेठ बिसनदास राठी यांनी आपल्या घरासमोरील खाली जागेत २७५ वर्षांपूर्वी विहिरीचे खोदकाम सुरू केले होते. काही अंतरावरच गणपतीची हुबेहुब मूर्ती निघाली.

ठळक मुद्देविहिरीच्या खोदकामातून मिळाली मूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील गणपती वॉर्ड येथील स्व. शेठ बिसनदास राठी यांनी आपल्या घरासमोरील खाली जागेत २७५ वर्षांपूर्वी विहिरीचे खोदकाम सुरू केले होते. काही अंतरावरच गणपतीची हुबेहुब मूर्ती निघाली. यामुळे विहिरीचे बांधकाम बंद करून तेथे मंदिराचे बांधकाम करून मूर्तीची स्थापना करण्यात आली.तेव्हापासून आजपर्यंत तेथे दररोज सकाळ सायंकाळ, पूजा अर्चा केली जात आहे. अत्यंत जुने असलेले गणपती मंदिर आर्वी शहर व परिसरात प्रसिद्ध आहे. मंदिराचे द्वार भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत उघडले जाते. याच वेळेत सर्व भाविक दर्शन घेऊन पूजा अर्चा करतात. या मंदिराची स्थापना सन १७७५ ते १८०० दरम्यान जवळपास ३०० वर्षांपूर्वी स्व. बिसनदास राठी यांच्याहस्ते करण्यात आली होती. दरवर्षी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यासाठी गणपती मंदिरासमोर तथा मंदिराला दिव्यांची आरास केली जाते. वर्षांतून दोन वेळा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दरम्यान ५६ भोग कार्यक्रम घेऊन संपूर्ण आर्वी शहरातील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.बिसनदास राठी याच्यानंतर त्यांचे पुत्र गोपालदास राठी, त्यानंतर त्यांचे पुत्र विठ्ठलदास राठी आणि सध्यास्थितीत सुधीर आणि अशोक राठी या जागेचे मालक म्हणून देखरेख करीत आहे. या मंदिरात १७५० रोजी प्रथम पुजारी म्हणून किसन पंडीत रावत, त्यानंतर भानू महाराज उर्फ फुलचंद सटोळ, त्यानंतर सत्यनारायण पुरोहित तर सध्या सागर पुरोहित हे पुजारी म्हणून काम पाहत आहेत.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८