शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

गांधीजींनी महिलांना नेतृत्वाची संधी दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:25 IST

सर्वोदय आणि गांधी संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व वाढले पाहिजे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे संधी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देशोभा शिराढोणकर : स्त्री व युवाशक्ती, समस्या आणि समाधान यावर चर्चासत्र

ऑनलाईन लोकमतसेवाग्राम : सर्वोदय आणि गांधी संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधीत्व वाढले पाहिजे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे संधी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे. आपण सतत गांधीजींच्या विचार व कार्यावर बोलतो; पण गांधीजींनी महिलांना पुढे करून नेतृत्व करण्याची संधी दिल्याने स्वातंत्र्य आंदोलनाला वेगळीच दिशा व धार मिळाली. यामुळे महिला, युवतींना स्थान व संधी दिली पाहिजे, असे मत शोभा शिराढोणकर यांनी व्यक्त केले.सेवाग्राम आश्रम परिसरात गांधीजींच्या १५० व्या जयंती अभियानांतर्गत ४७ वे अखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलन सुरू आहे. यात शनिवारी सकाळी ‘स्त्री व युवा शक्ती, समस्या व समाधान’ यावर चर्चासत्र पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.आशा यांनी गांधी विचार पूढे न्यायचा असेल तर याची सुरुवात स्वत:पासून करावी लागेल. तरच जग बदलेल. उत्तराखंडात विकासाच्या नावावर आमच्या गावात आमचे सरकार याची प्रकर्षाने गरज आहे. ओरियाचे मधुसूदन म्हणाले की, चांगली कविता, पोवाडे शिकून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद वाढविण्यासाठी उपयोगी पडेल. आपण राष्ट्रवादांची चर्चा करतो; पण शेजाºयांशी आपली वागणूक व संबंध कसे आहेत यावर विचार, कृती करण्याची गरज आहे. उषा संतकन्या म्हणाल्या की, आपण ध्येय बाळगून पूढे गेलो पाहिजे. ‘माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी’ हे घोषवाक्य मनात बाळगावे, असे सांगितले.सारंग रघाटाटे म्हणाले की, आजच्या परिस्थितीत प्रत्येकाच्या हातात मोबाईल नसून प्रत्येक मोबाईलच्या हातात माणूस आहे. अदिती पटनायक यांनी भारत युवकांचा देश आहे. लोकसंख्येचे रूपांतर शक्तीमध्ये व्हावे. युवक, युवतींना कागदी शिक्षणापेक्षा रोजगाराभिमूख शिक्षण मिळावे. गांधीजींचे तत्वज्ञान जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगात आणावे, असे सांगितले. नयनताराचे बसंत पांडे यांनीही चर्चासत्रामध्ये सहभाग नोंदविला.१५० कार्यक्रमत्रिपुरामध्ये गांधी १५० अभियान अंतर्गत १५० कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. गांधी विचारांचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे. तेथील लोकांना विकास काय आहे, हे माहिती नाही. इतका तो भाग मागास आहे, असे त्रिपुराचे देवाशिष यांनी सांगितले.