शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सेवाग्राममध्ये २८ पासून गांधी विज्ञान संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 13:43 IST

गांधी विज्ञान संमेलनाचे २८ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत सेवाग्राम येथील नयी तालीम परिसरात आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदेशभरातले २०० प्रतिनिधी हजर राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, त्यांनी केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांचा व त्यांच्या समकालीन औचित्याचा वेध घेण्याच्या अनुषंगाने जनसहयोग ट्रस्टच्या माध्यमातून गांधी विज्ञान संमेलनाचे २८ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत सेवाग्राम येथील नयी तालीम परिसरात आयोजन करण्यात आले आहे.तीनदिवसीय या संमेलनाकरिता महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील २०० पेक्षा अधिक प्रतिनिधी एकत्रित येणार आहेत.संमेलनाचे उद्घाटन २८ ला सकाळी १०.३० वाजता वैज्ञानिकता आणि गांधीजी या विषयाने डॉ. अनिल सद्गोपाल करणार आहेत. डॉ. अभय बंग यांचे बीजभाषण होईल. अध्यक्षस्थानी जी. जी. पारिख असणार आहेत. तत्पूवीर १० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. गुप्ता यांच्या हस्ते होईल. दुपारच्या सत्रात रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, सोपान जोशी, अतुल देऊळगावकर, आनंद माझगावकर, प्रदीप शर्मा विषयांची मांडणी करणार आहेत. १ मार्चला अशोक बनग, निरंजना मारू, अजय चांडक, डॉ. सतीश गोगुलवार, सुषमा शर्मा, सोहम पंड्या, करुणा फुटाणे, योगेश कुलकर्णी, श्रीकांत नावरेकर, विजय दिवाण विचार मांडतील. अध्यक्षस्थानी धरामित्रचे डॉ. तारक काटे राहणार आहेत. यानंतर गटचर्चा, एकत्रित चर्चा होणार आहे. २ मार्चला युवा वैज्ञानिकांची मांडणी, उद्याचे प्रश्न व गांधी विज्ञानाच्या संभाव्यता याविषयावर चर्चासत्र होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद वाटवे असतील. गांधी विज्ञानाच्या प्रकाशात, शाश्वत विकासाच्या दिशेने या विषयाची मांडणी मेधा पाटकर करणार असून यानंतर संमेलनाचा समारोप होणार आहे.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम