शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

गांधींना त्यांच्याच पद्धतीने समजून घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:30 IST

महात्मा गांधींनी हिंदस्वराज लिहिण्याआधी आपल्या पोराल या मित्राला पत्र लिहून १६ सूत्रांतून या पुस्तकाचे सूतोवाच केले होते. भारताच्या संस्कृतीचा शोध घेता यावा यासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला. युनानी, युरोप या पाश्चात्य संस्कृतीला मूल्यांचा आधार नाही म्हणून त्याचे भवितव्य अस्थिर, तर भारतीय संस्कृतीत साऱ्या प्रश्नांची उत्तरे-उपाय आपल्यात सापडतात, ती परिवर्तनशील आहे, नदीसारखी प्रवाहित आहे, संस्कृतीची परंपरा ही प्रगतीकडे जाणारी असते. परंपरासुद्धा प्रगतिशील असते, हे गांधींनी हिंदस्वराजमधून सिद्ध केले आहे. हिंदस्वराजकडे आपण गांधींच्या दृष्टीने बघणे आवश्यक ठरते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हिंदी समीक्षक आणि अनुवादक प्रा. देवराज यांनी केले.

ठळक मुद्देप्रा. देवराज : भा. ल. भोळे, यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार वितरण समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधींनी हिंदस्वराज लिहिण्याआधी आपल्या पोराल या मित्राला पत्र लिहून १६ सूत्रांतून या पुस्तकाचे सूतोवाच केले होते. भारताच्या संस्कृतीचा शोध घेता यावा यासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला. युनानी, युरोप या पाश्चात्य संस्कृतीला मूल्यांचा आधार नाही म्हणून त्याचे भवितव्य अस्थिर, तर भारतीय संस्कृतीत साऱ्या प्रश्नांची उत्तरे-उपाय आपल्यात सापडतात, ती परिवर्तनशील आहे, नदीसारखी प्रवाहित आहे, संस्कृतीची परंपरा ही प्रगतीकडे जाणारी असते. परंपरासुद्धा प्रगतिशील असते, हे गांधींनी हिंदस्वराजमधून सिद्ध केले आहे. हिंदस्वराजकडे आपण गांधींच्या दृष्टीने बघणे आवश्यक ठरते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हिंदी समीक्षक आणि अनुवादक प्रा. देवराज यांनी केले.यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीने आयोजित डॉ. भा. ल. भोळे आणि डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पुरस्कार समितीचे निमंत्रक किशोर बेडकिहाळ, संस्थाध्यक्ष प्रदीप दाते, सदस्य डॉ. राजेंद्र मुंढे, प्रा. शेख हाशम आणि पुरस्कारप्राप्त लेखक रामदास भटकळ, प्रा. उदय रोटे आणि प्रसाद कुलकर्णी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.संसदीय व्यवस्थेचे गुणगाण केले जाते, ती गांधींची संसदीय व्यवस्था नाही. मात्र, ती स्वीकारून तडजोड करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगून प्रा. देवराज म्हणाले, संसदेने मौलिक अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे सत्ता स्वत:च्या हातात घेणे तसेच कुठला अधिकार कुठल्या सीमेपर्यंत द्यायचा, हेही व्यवस्था ठरवत असते. त्यामुळे गांधींंना ती व्यवस्था स्वीकार नव्हती, असेही ते म्हणाले.अनेकजण म्हणतात, भाषा बारा कोसावर बदलत असते. गांधींजींनी वापरलेल्या भाषेत अनेक शब्द आढळतात. त्यामधील एक म्हणजे 'गॉड' शब्दाचा अर्थ आपल्यासाठी राम, कृष्ण, विठ्ठल, असा आहे. मात्र, गांधींजींच्या मते तो त्याचा अर्थ तसा नाही. त्यांनी रामाला देवाचा अवतार मानला नाही, तर ऐतिहासिक व्यक्तीही मानले नाही. त्यामुळे गांधी समजून घेताना त्यांच्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. गांधींना समजणे वाटते तितके सोपे निश्चितच नाही, असे मत भटकळ यांनी व्यक्त केले. प्रा. रोटे, कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने यंदाचा डॉ. भा. ल. भोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा वैचारिक ग्रंथ लेखन पुरस्कार मुंबईचे रामदास भटकळ यांच्या 'हिंदस्वराज' या मराठी अनुवादासाठी देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार इचलकरंजीचे प्रसाद कुलकर्णी यांना तर डॉ. यशवंत सुमंत युवा संशोधक प्रेरणा पुरस्कार अंबरनाथचे प्रा. उदय रोटे यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १० हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बेडकिहाळ यांनी पुरस्कार निवडीमागील भूमिका व लेखकांचा परिचय करून दिला. प्रा. गजानन अपीने यांनी उदय रोटे यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. मुंढे आणि प्राचार्य रंजना दाते यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. हाशम यांनी प्रास्ताविक तर संचालन प्रा. अमोल गाढवकर यांनी केले. प्रदीप दाते यांनी आभार मानले . कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता आकाश दाते, रजत देशमुख यांनी सहकार्य केले. डॉ उल्हास जाजू, लेखक रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, सतीश तांबे, कवी -समीक्षक प्रा. अभिजित देशपांडे, प्रा. अपीने यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.