शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

गांधी जिल्हा नामांतरणाची फाईल ३५ वर्षांपासून धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 15:47 IST

वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा व्हावा ही वर्धा जिल्ह्यातील थोर राष्ट्राय नेते स्व. विनोबा भावे यांची इच्छा होती. राज्य शासनाने ही योजना पुनरूज्जीवित केल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास तर होईलच; पण त्याचबरोबर स्व. विनोबा भावेंना ही खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.

ठळक मुद्दे१९८३ ला झाली होती घोषणा सरकारला पडला विसर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासनाने २ आॅक्टोबर १९८३ रोजी वर्धा शहरात आयोजित केलेल्या एका भव्य समारंभात वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून घोषित केला होता. या समारंभाला तत्कालीन केंद्रीय उद्योगमंत्री नारायणदत्त तिवारी, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि इतर मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेनुसार वर्धा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करून हा जिल्हा जागतिक नकाशावर आणण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला होता.या घटनेला २ आॅक्टोबर २०१८ रोजी ३५ वर्षे पूर्ण होतील; पण या समारंभानंतर वर्धेला गांधी जिल्हा म्हणून विकसित करण्याची योजना आणि संकल्पना राज्यशासनाने आणि केंद्राने पूर्णत: बासनात गुंडाळून ठेवलेली आहे. आज घटकेला असा काही समारंभ झाला होता आणि अशी काही संकल्पना पूढे आली होती, हा मुद्दा जनसामान्य तर विसरलेच; पण शासकीय यंत्रणाही पूर्णत: विसरलेली आहे. सर्वांगीण विकासाचे मागील ७० वर्षांपासून स्वप्न बघणारा वर्धा जिल्हा आज जिथल्या तिथेच आहे, असे नाही तर अधिकच गर्तेत गेलेला दिसतो आहे.वर्धा जिल्ह्यात मागील ७० वर्षांत अनेक राजकीय दिग्गज कार्यरत राहिले. वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा व्हावा ही वर्धा जिल्ह्यातील थोर राष्ट्राय नेते स्व. विनोबा भावे यांची इच्छा होती. राज्य शासनाने ही योजना पुनरूज्जीवित केल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास तर होईलच; पण त्याचबरोबर स्व. विनोबा भावेंना ही खरीखुरी श्रद्धांजली ठरेल. मागील ३५ वर्षांत या योजनेवर फारसे काहीही झाले नसल्याने या योजनेची कागदपत्रे २०१२ च्या मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळून गेली, असा खुलासाही मंत्रालयातील नोकरशाही करू शकेल. अशा परिस्थितीत या योजनेची कागदपत्रे आणि प्रस्ताव इतरत्रही उपलब्ध असू शकतात. या प्रकरणात शासनाने आवश्यक ती पावले उचलून येत्या २ आॅक्टोबर २०१८ पूर्वी याबाबत निश्चित घोषणा करणे गरजेचे झाले आहे.

राज्य शासनाने ही योजना आणि संकल्पनेच्या प्रस्तावावरील धूळ झटकून तो बाहेर काढावा. त्या योजनेत परिस्थितीजन्य सुधारणा करून वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा कालबद्ध कार्यक्रम प्रत्यक्ष कृती अहवालासह जाहीर करावा. त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद त्वरित करावी.- सुबोध मोहिते पाटील, माजी केंद्रीय मंत्री तथा स्वाभिमानी पक्षाचे नेते, वर्धा.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी