शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

रखरखत्या उन्हात वितभर पोटासाठी तप्त लोखंडाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:07 IST

पाच अंकी पगार किंवा लाखो रुपयांचा वैध, अवैध व्यवसाय करून ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या या समाजात पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात परिश्रम करूनसुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याची चणचण भासणाऱ्या कुटुंबाची कमी नाही.

ठळक मुद्देपावसाळा संपला की भटकंती सुरू : १४ कुटुंबांकरिता आकाशच झाले छत, उघड्यावरच करतात स्वयंपाक

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : पाच अंकी पगार किंवा लाखो रुपयांचा वैध, अवैध व्यवसाय करून ऐशोआरामी जीवन जगणाऱ्या या समाजात पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात परिश्रम करूनसुद्धा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याची चणचण भासणाऱ्या कुटुंबाची कमी नाही. एकीकडे फॅशन व शौक म्हणून अपुरे कपडे घालतात. तर काहींना आर्थिक अडचणीअभावी पुरेसे कपडे घालता येत नाही. एकीकडे फॅशन म्हणून आपल्या थाळीत उष्टे अन्न ठेवण्यात येते, तर अनेकांना खाण्यासाठी थाळीत अन्न मिळत नाही. अशा विराधाअभावी आणि मन पिळवटून टाकणारी अनेक उदाहरणे या समाजात पहायला मिळतात.अशाच अत्यंत काबाडकष्ट करून पोट भरण्यासाठी धडपड करणाºया का भटकी कुटुंबियांची भेट घेण्याचा आणि त्यांचे दुख: जाणून घेण्याचा योग आज सकाळी ७ वाजता फिरायला जाताना आला. कारंजा पंचायत समोरील मोकळ्या जागेत ८ मोठी बाया माणसं आणि ६ लहान मुले-मुली. लोहाराचा व्यवसाय करताना दिसून आली.महिला नाजूक हातात मोठा घन घेत तप्त लोखंडावर आदळून लोखंडाला आकार देत होत्या. तर माणसं तप्त लोखंड धरून त्यावर घाव घालून पाहिजे त्या आकाराची वस्तू बनवित होते. खेळण्याचे दिवस असलेली पाच ते सहा वर्षांची मुले भाता फुकून लोखंडाला तापविण्याचा प्रयत्न करीत होती. या कुटुंबीयांचा प्रमुख पप्पू चव्हाण (६०) यांची प्रतिनिधीने भेट घेत कुटुंबीय व व्यवसायाबद्दल जाणून घेतले. प्रत्येकी चार महिला आणि चार पुरूष, तीन छोट्या मुली व तीन छोटी मुले असे कुटुंब असून मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील गिराम सुवाहा येथील रहिवासी असल्याचे सांगितले.पावसाळा संपला की आॅक्टोबर महिन्यामध्ये या व्यवसायासाठी ते निघतात. पावसाळा येईपर्यंत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, उत्तरप्रदेश, बिहार या राज्यात फिरतात. उदरनिर्वाहासाठी सकाळी ६ वाजतापासून या काबाड कष्टाला ते सुरूवात करतात. रात्री ९ पर्यंत व्यवहार चालतो. रात्री येथेच स्वयंपाक करतात अन् झोपतो. सकाळी उठून परत कामाला सुरूवात करतो. महागाईमुळे या व्यवसायातून पोटापुरती मिळकत त्यांना मिळत नाही. पिढीजात म्हणून अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असल्याचे सांगितले.मध्यप्रदेशात राहायला घर नाही. शेती नाही, प्लॉट नाही, स्थायी व्यवसाय नाही. सरकार लक्ष देत नाही. म्हणून देशोदेशी या लहान मुलांना घेऊन भटकावे लागते. या भटकंतीमुळे मुले शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षण न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव याच कठीण व मेहनती व्यवसायात आमच्या मुलांना शिरावे लागते, असे गटप्रमुख बेतालसिंग चव्हाण यांनी बोलून दाखविले.कच्चे लोखंड विकत घेऊन त्यापासून कुºहाड, वासला, विळा, व फास अशी अवजारे ते तयार करतात. व्यवसायाला मदत म्हणून कढई, झारे, तवा, सराटे आणून विकतात. राहणीमानाचा खर्च कमी असल्यामुळे कसाबसा उदरनिर्वाह चालवितो. बरेचदा इकडे व्यवसायासाठी फिरत असताना मूळ गावात थांबलेले, आई-वडीलाचे देहानवसान होते, पण भेट होत नाही, अशी संवेदनासुद्धा मोहनसिंग सिसोदिया (२६) यांनी व्यक्त केली. शेती व घरगुती कामासाठी ते उपयुक्त अवजारे तयार करतात. पाच किलोचा घन उचलून घाव घालताना छाती, कंबर, पाठ दुखते, पण सांगायचे कुणाला? सगळे दुख अंगाला झेलावे लागते. माणसाला मदत म्हणून सगळं कराव लागतं.भाता फुकण्याचे काम लहान मुले करतात. त्यांना खेळायला मिळत नाही. इतकी थकतात की पटकन झोपतात आणि सकाळी परत आपल्या आई वडिलांसोबत उठतात आणि कामाला लागतात. झोपायला गादी नाही. कुलर नाही. निसर्गाच्या कुशीत आईवडिलांच्या प्रेमात सर्व विसरून गाढ झोपून जातात. आमच्या समस्या कुणीतही शासनाकडे मांडाव्यात, अशी तीव्र इच्छा सिसोदिया यांनी बोलून दाखविली.