शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडीचा तिढा कायम

By admin | Updated: July 30, 2016 00:34 IST

राजकीय डावपेच : स्थायी समितीच्या निर्णयाकडे लक्ष

 नाशिक : घंटागाडीचा पाच वर्षांच्या कालावधीकरिता १७६ कोटी रुपयांचा ठेका देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मान्यतेसाठी प्रशासनाने पाठविल्यानंतर राजकीय स्तरावर डाव-प्रतिडाव रचले जात असून, सत्ताधाऱ्यांबरोबरच ठेकेदारांची कोंडी करण्याचाही प्रयत्न सुरू झाला आहे. शिवसेनेने सत्ताधारी मनसेला सदोष प्रस्तावाबद्दल लक्ष्य केले आहे, तर मनसेतील एक गट काळ्या यादीतील ठेकेदारांना ठेका मिळता कामा नये, यासाठी सक्रिय झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला घंटागाडीचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने प्रशासनाचीही पिडा वाढली आहे. मावळते आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कारकिर्दीत राबविलेल्या निविदाप्रक्रियेनंतर नूतन आयुक्तांनी सहा विभागांसाठी घंटागाडीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. घंटागाडी या विषयावर सभापती सलीम शेख यांनी विशेष सभा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार शनिवारी (दि.३०) स्थायीची सभा घेण्याची तयारी सुरू होती, परंतु प्रस्तावातील एकेक भानगडी बाहेर पडू लागल्याने स्थायी समितीनेही घाईगर्दी न करता पुढील आठवड्यात सभा घेण्याचे ठरविले आहे. घंटागाडीच्या मूळ निविदांमधील अटी-शर्ती आणि प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेल्या प्रस्तावांतील अटी-शर्ती यामध्ये तफावत असल्याची चर्चा सुरू झाल्याने ठेक्याला विरोध सुरू झाला आहे. त्यातच घंटागाडी ठेकेदारांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ६० कोटींचा ठेका १७६ कोटींपर्यंत कसा फुगला याचे स्पष्टीकरण दिल्याने चर्चेला आणखी खाद्य मिळाले आहे. घंटागाडीच्या प्रस्तावात आरोग्य विभागाने शहराची पाच वर्षांची लोकसंख्या थेट ९८ लाखांवर नेऊन ठेवल्यानेही त्यावरही विरोधकांनी एकूणच प्रस्तावाबद्दल संशय व्यक्त केला आहे. शिवसेनेने तर सत्ताधारी मनसेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात टाकत सत्ताधारी मनसेचे धोरण ‘ठेकेदार हिताय’ असल्याचे म्हटले आहे, तर निविदांमधील अटी-शर्तीतील फेरबदलाबाबत मनसेतीलच एका गटाने आक्षेप घेत कोणत्याही परिस्थितीत काळ्या यादीतील ठेकेदारांना ठेका मिळू नये, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या साऱ्या राजकारणात स्थायी समिती नेमका काय निर्णय घेते यावरच घंटागाडीचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)