शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांचा अवधी दिल्याने न.प.चा गजराज परतला

By admin | Updated: February 14, 2017 01:27 IST

स्थानिक जुना आरटीओ चौक परिसरातील नगर पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेतील प्रभु विश्वकर्मा यांच्या मंदिराचे सुरू असलेले बांधकाम थांबविण्यात यावे, ...

अतिक्रमण हटाव मोहीम : मंदिर बांधकामाचा मुद्दावर्धा : स्थानिक जुना आरटीओ चौक परिसरातील नगर पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेतील प्रभु विश्वकर्मा यांच्या मंदिराचे सुरू असलेले बांधकाम थांबविण्यात यावे, अशा सूचना स्थानिक नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंदिर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. याऊपरही मंदिराचे बांधकाम सुरूच असल्याने ते बांधकाम पाडण्यासाठी सोमवारी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी न.प.च्या गजराजसह बांधकाम स्थळ गाठले. यावेळी विरोध झाला.यानंतर चर्चेतून तीन दिवसांचा अवधी मागितला. त्यावर पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविल्याने न.प.चा गजराज बांधकाम न तोडताच परतला. दरम्यान काही काळाकरिता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, जुना आरटीओ चौक बॅचलर रोड या परिसरात नगर पालिका प्रशासनाच्या मालकीची मोकळी जागा आहे. या जागेवर सध्या महाराष्ट्र विश्वकर्मा महासंघाच्यावतीने प्रभू विश्वकर्मा यांच्या मंदिराचे बांधकाम सुरू होते. सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचा आधार घेत सदर सुरू असलेले बांधकाम थांबविण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मंदिर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना बांधकाम त्वरीत बंद करण्याच्या सूचना दिल्या. परंतु, पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आल्याने सोमवारी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीसह बांधकाम स्थळ गाठले. यावेळी बांधकाम तोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मंदिर देवस्थान कमिटीच्या पदाधिकारी व पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांत चर्चा झाली. मंदिर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी बाजू समजावून घेण्यात आली. यावेळी नगर पालिकेचे अशोक ठाकूर, जगताप, सुरजपाल बघेल, निखील लोहवे, प्रदीप वानखेडे, चेतन कहाते, भोसले, विशाल सोमवंशी, गजानन पेटकर, चेतन खंडारे, विजय किनगावकर, अविनाश मरघडे, फारुकी, प्रशांत मेंढे, लिलाधर निखाडे, डंबारे, मुकीम शेख, मानकर आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)लेखी सूचनाच नव्हत्या-अजय जानवेबॅचलर रोडवरील जुना आरटीओ चौक परिसरतील नगर पालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेत प्रभू विश्वकर्मा यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी १७ एप्रिल १९८९ च्या न.प.च्या विशेष सभेत ठराव घेऊन मंजूरी देण्यात आली आहे. सुरू असलेले बांधकाम बंद करण्यासाठी लेखी सूचना देणे क्रमप्राप्त होते. परंतु, केवळ मौखिक सूचना देण्यात आल्या. सदर कार्यवाहीमुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ बांधकाम सुरू करू देण्यासाठी संबंधीतांनी आदेश निर्गमित करावा, अशी मागणी अजय जानवे यांनी केली आहे. पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चर्चा करताना मंदिर देवस्थानचे भारत आगरकर, नरेंद्र झापेकर यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.