शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणावर चालला न.प.चा गजराज

By admin | Updated: January 12, 2017 00:33 IST

शहरातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे अनेक रस्ते अरूंद होत आहे. रस्ते मोकळे करण्यासाठी वर्धा

पालिकेची अतिक्रमण हटाओ मोहीम : छोट्या व्यावसायिकांची प्रतिष्ठाने हटविली वर्धा : शहरातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे अनेक रस्ते अरूंद होत आहे. रस्ते मोकळे करण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाओ मोहीम हाती घेण्यात आली आहे. यार बुधवारी पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात स्थानिक महात्मा गांधी पुतळा चौक ते इंदिरा गांधी पुतळा चौक दरम्यानचे अतिक्रमण काढले. सदर मोहिमेदरम्यान पालिका कर्मचाऱ्यांनी अनेक छोट्या व्यावसायिकांची दुकाने हटविली. शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी वाढलेले अतिक्रमण हटविणे आणि अरुंद रस्ते मोकळे करण्याकरिता रस्त्याच्या कडेला थाटलेल्या दुकानांना हटविण्यात आले. सदर मोहीम तीन दिवस प्रभावीपणे राबविली जाणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. दरम्यान महात्मा गांधी पुतळा ते इंदिरा गांधी पुतळा चौक तसेच महात्मा गांधी पुतळा चौक ते बजाज चौक या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. बुधवारी सकाळपासूनच पालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याचे कार्य सुरू केले. या मोहीमेदरम्यान पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पोकलँडच्या सहाय्याने सिव्हील लाईन परिसरातील प्रशासकीय इमारती समोरील अनेक छोट्या व्यावसायिकांची दुकाने हटविली. या मोहिमेत वर्धा नगर परिषदेचे अभियंता सुधीर फरसोले, कर्मचारी अशोक ठाकूर, निखील लोहवे, लिलाधर निखाडे, प्रवीण बोबडे, दिलीप बुथे, राहुल भगत, खुशाल गोळघाटे, विशाल सोमवंशी, चेतन खंडाते, दिलीप तराळे, प्रमोद तामगाडगे, राजेंद्र शंभरकर आदी सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) शहरातील रस्ते घेणार मोकळा श्वास शहरातील रस्त्यांवर वाढते अतिक्रमण पाहता रस्त्यांचा आकार कमी होत आहे. वाहनांची संख्या वाढतच असून काही वर्दळीच्या मार्गावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अरूंद झाला आहे. या रस्त्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. हे अतिक्रमण हटविण्याची मगाणी वाहन चालकांतून करण्यात आली. पालिकेने हाती घेतलेल्या या मोहिमेतून शहरातील रस्ते मोकळे करण्यात येत आहे. यातून वाहतुकीची होणारी कोंडी कमी करण्याचा प्रयत्न असणार आहे. यात अनेक छोट्या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांवर गदा येणार असल्याचे दिसते.